: राज्यात दुर्मीळ असलेला राज्यप्राणी शेकरू, उडणारी खार व राज्यपक्षी हारावतासह दयाळ पक्ष्याची शिकार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश आलापल्ली वन विभागाने केला. रविवार, १९ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास जंगलात लपून बसलेल्या १२ शिकाऱ्यांना वनविभागाच्या पथकाने थरारक पाठलाग करून रंगेहाथ पकडले.
आलापल्ली वन विभागाचे पथक गस्तीवर असताना शिकाऱ्यांची टोळी जंगलात लपून असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वन विभागाच्या पथकाने कारवाई करत शिकाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शिकार केलेले वन्यजीव आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे. आरोपींविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मधील विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला.

आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने ब्लु स्टार न्युज नाशिक आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.
