गोंदिया

एनएमसी झोनच्या त्या १५ नक्षलवाद्यांच्या कायदेशिर आत्मसमर्पणाची प्रक्रिया पूर्ण

मध्यप्रदेश महाराष्ट्र-छत्तीसगड झोनचे पूर्वाश्रमीचे प्रवक्ते विकास उर्फ अनंत नागपुरे यांच्यासह १४ स्त्री व पुरुष नक्षलवाद्यांनी गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. या नक्षलवाद्यांची कायदेशिर आत्मसमर्पणाची प्रक्रिया शुक्रवारी (दि.१७) जिल्हाधिकारी मंगेश गोंदावले यांच्या उपस्थित पार पडली.

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी १५ पूर्वाश्रमीच्या नक्षलवाद्यांचा कायदेशीररित्या समर्पणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचे पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभय डोंगरे,सहायक आयुक्त गुप्तवार्ता औटी, पोलीस निरीक्षक प्रमोद भातनाते, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत हत्तीमारे, नक्षल कक्षाचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते. आत्मसमर्पित नलक्षवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून सनदशीर मार्गाची कास समर्पित नक्षलवाद्यांनी धरावी असे जिल्हाधिकारी मंगेश गोंदावले यांनी सांगितले. केंद्र शासन व राज्य शासनाच्यावतीने समर्पित नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनाच्या ज्या योजना आहेत त्याचा लाभ सुविधा पुरविण्यात येईल, अशी हमीही त्यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *