अमरावती

परतवाडा व्हिडिओ कांड : अल्पवयीन पीडितेचे बयाण नोंदवले, पण पोलिसांकडून कमालीची गोपनीयता !

संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या परतवाडा येथील लैंगिक अत्याचार, आक्षेपार्ह व्हिडीओ चित्रीकरण ते व्हिडीओ, फोटो सोशल व्हायरल केल्याच्या गंभीर प्रकरणात शनिवारी एका १५ वर्षीय पीडितेचे बयाण नोंदवण्यात आले. मात्र, या बयाणात पीडितेने नेमकी काय माहिती दिली आणि तिच्या बयाणानंतर पोलिस आता कोणती भूमिका घेणार, याबाबत रविवारी दिवसभर प्रशासनाने प्रचंड गोपनीयता बाळगली. १३ एप्रिल रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल पाच दिवसांनी ही पीडिता बयाणासाठी समोर आली, हे विशेष.

अमरावती ग्रामीण पोलिस घटकात पोलिस निरीक्षक दर्जाची महिला अधिकारी उपलब्ध नसल्याने, या प्रकरणाच्या संवेदनशीलतेमुळे यवतमाळ सायबर पोलिस स्टेशनच्या प्रमुख पोलिस निरीक्षक यशोधरा मुनेश्वर यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. मुनेश्वर आणि बालकल्याण समिती सदस्यांच्या उपस्थितीत नागपूरहून आलेल्या या पीडितेचे बयाण एका अज्ञात स्थळी नोंदवण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *