हिंगोली/परभणी/नांदेड: मराठवाड्यातील हिंगोली, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांना आज, शनिवारी (दि. ११) सकाळी ८:४५ ते ८:४६ च्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. हा धक्का ४.७ रिश्टर स्केल असल्याची माहिती आहे. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली शहर, वसमत, औंढा आणि कळमनुरी तालुक्यात धक्के बसताच नागरिक घराबाहेर पडले. त्यानंतर लगेचच परभणी शहर व जिल्ह्याच्या काही भागांत आणि नांदेड जिल्ह्यातही जमिनीला कंप जाणवल्याने काही काळ घबराट पसरली होती.
एकाच वेळी तीन जिल्ह्यांत कंप
हिंगोली जिल्ह्याला ८:४५ वाजता पहिला धक्का बसला, तर त्याच्या एका मिनिटानंतर म्हणजेच ८:४६ वाजता परभणी आणि नांदेड जिल्ह्यालाही भूकंपाची जाणीव झाली. सकाळी कामाच्या गडबडीत असतानाच अचानक खिडक्या आणि घरातील भांडी वाजू लागल्याने नागरिकांना भूकंपाची खात्री पटली. विशेषतः वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे भागात गेल्या अनेक दिवसांपासून हे सत्र सुरू असल्याने ग्रामीण भागात मोठी दहशत पाहायला मिळत आहे.

आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने ब्लु स्टार न्युज नाशिक आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.
