बीड

गर्भपातानंतर रुग्णालयात धाव, डॉक्टरांच्या तत्परतेमुळे बालविवाहाचे क्रूर सत्य समोर; ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा

पोटात दुखू लागल्याने आणि अतिरक्तस्राव होत असल्याने सोलापूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या एका अल्पवयीन विवाहितेच्या उपचारादरम्यान बालविवाहाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयात कागदपत्रे तपासली असता पीडितेचे वय उघड झाले आणि तेथूनच कायद्याचा बडगा उगारला गेला. या प्रकरणी पतीसह दोन्ही कुटुंबांतील पाच जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायदा व ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा नोंदवून तो केज पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पीडित मुलगी १० वीत शिकत असतानाच, दोन वर्षांपूर्वी तिचा विवाह केज तालुक्यातील एका गावात लावून देण्यात आला होता. ती अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही दोन्ही कुटुंबांनी हा विवाह लावून दिला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *