क्राईम ताज्या बातम्या

बेकायदा दारू विक्री करणाऱ्यांवर नाशिक रोड पोलिसांची कारवाई

बेकायदा दारू विक्री करणाऱ्यांवर नाशिक रोड पोलिसांची कारवाई

बेकायदा दारू विक्री करणाऱ्यांवर नाशिक रोड पोलिसांची कारवाई,नाशिकरोड परिसरातील जेलरोड पवारवाडी येथे बेकायदेशीर दारू विकणाऱ्या दिलीप वाघ व निलेश पेखळे यांच्यावर नाशिकरोड पोलिसांनी कारवाई करून २,१७० रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहे.

पोलीस शिपाई मनोहर कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार अखिलेश दिलीप वाघ राहणार पवारवाडी, हिंदशक्ती नगर, भगवती लॉन्ससमोर, मोरे मळा, जेलरोड आणि निलेश पेखळे राहणार पवारवाडी, हिंदशक्ती नगर, जेलरोड हे दोघे पवारवाडी रस्त्यावरील सेंटर जिहान चिकन सेंट्रल येथे विनापरवानगी ग्राहकांना दारू विक्री करताना पोलिसांना आढळून आले.पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन २,१७० रुपयांच्या प्रिन्स संत्रा देशी दारूच्या काचेच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या आदेशाने नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीत दारूबंदी अधिनियमांतर्गत दोघांवर कारवाई करण्यात आली आहे.पोलीस नाईक कुराडे पुढील तपास करीत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *