क्राईम ताज्या बातम्या

पालखी सोहळ्यात दागिने चोरमारे जोडपे जेरबंद….. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…. तीन लाखाचा मुद्देमाल जप्त….

पालखी सोहळ्यात दागिने चोरमारे जोडपे जेरबंद….. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…. तीन लाखाचा मुद्देमाल जप्त….

त्रंबकेश्वर येथे श्री. संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळयात भाविकांचे सोन्याचे दागिने चोरी व पाकीटमारी करणारे जोडप्याला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. आषाढ वारीच्या निमित्ताने त्रंबकेश्वर येथून श्री. संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी दिंडीचा रथसोहळा १० जुन रोजी प्रस्थान झाला. यावेळी अज्ञात चोरटयांनी सोहळयासाठी जमलेल्या भाविकांचे गर्दीचा फायदा घेवुन ३,१६,८००/- रू. किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरी करून चोरून नेला होता.

याबाबत त्रंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ०१ जून रोजी त्रंबकेश्वर एस.टी. स्टॅण्ड परिसरात बसमध्ये चढत असतांना गर्दीचा फायदा घेवुन अज्ञात चोरटयांनी पहिने, ता. त्रंबकेश्वर येथील एका महिलेचे गळयातील नव्वद हजार रुपये सोन्यावी पोत चोरून नेली होती. अंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे नाशिक शहरातून संशयित मंगेश अशोक राखपसरे, वय २४, रा. टाकळी गाव, नाशिक व त्याची पत्नी निशा मंगेश राखपसरे, वय २५, रा. टाकळी गाव, नाशिक यांना ताब्यात घेतले. दोघांनी मिळून गत आठवडयात त्रंबकेश्वर येथे जावून श्री. संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा व त्रंबक बसस्टॅण्ड परिसरातून भाविकांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केल्याची तपासात कबुली दिलेली आहे.

सदर आरोपींचे कब्जातुन वरील गुन्हयात चोरीस गेलेल्या दागिन्यांची मोड सोन्याची लगड, चार मोबाईल फोन, तसेच गुन्हयात वापरलेली यामाहा फसीनो मोटर सायकल असा एकुण ३ लाख रुपये किंमतीवा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यातील मंगेश अशोक राखपसरे हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर यापुर्वी नाशिक शहरातील सरकारवाडा, मुंबई नाका व पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचे एकुण ०५ गुन्हे दाखल आहेत. सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर, पोलीस अंमलदार संदिप नागपुरे, सुशांत मरकड, जालिंदर खराटे, नवनाथ वाघमोडे, सतिष जगताप, प्रविण गांगुर्डे, सचिन पिंगळ, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, ललिता शिरसाठ आदींनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *