क्राईम ताज्या बातम्या

मालेगाव येथून चोरी केलेली पिकअप व्हॅन जप्त….. ग्रामीण स्थानिक गुन्हे शोध पथकाची कारवाई…..

मालेगाव येथून चोरी केलेली पिकअप व्हॅन जप्त….. ग्रामीण स्थानिक गुन्हे शोध पथकाची कारवाई…..

मालेगाव तालुक्यातील दाभाडी शिवारातून पिकअप वाहन चोरणारा चोरट्याला नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेत कारवाई केली आहे. २४ मे रोजी मालेगाव तालुक्यातील दाभाडी गावशिवारातून सचिन भगवान सुर्यवंशी रा. मुंगसे, ता. मालेगाव यांच्या मालकिची रॉयल किंग चक्की आटा कंपनीची बोलेरो पिकअप गाडी क्र.एम.एच.१८.ए.ए.३२६५ ही दाभाडी शिवार मालेगाव येथे लावलेली असतांना अज्ञात चोरटयाने चोरून नेली होती. मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करत असताना सदर चोरीचे वाहन हे मालेगाव शहराच्या दिशेने आल्याचे प्राथमिक दृष्टया निदर्शनास आल्यानंतर पथकाने वाहनाचा माग काढून गोपनीय माहिती घेवून संशयित आसिफ ईकबाल सैफ अहमद, वय ३२, रा. रमजानपुरा, मालेगाव, ता. मालेगाव याला मुंबई आग्रा महामार्गावरील मड्डे हॉटेल परिसरातून ताब्यात घेण्यात घेतले.


संशयिताने दाभाडी शिवारातून सदर पिकअप वाहन चोरी केल्याची कबुली दिली असून त्याच्या ताब्यातून बोलेरो पिकअप वाहन क. एम.एच.१८.ए.ए.३२६५ कि. १,३५,०००/-रू. चे हस्तगत करण्यात आली आहे. आसिफ इकबाल हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर यापुर्वी वाहन चोरी, चोरी यासारखे गुन्हे दाखल आहेत.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव कॅम्प विभाग सुरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर, पोलीस उप निरीक्षक दत्ता कांभीरे, पोलीस अंमलदार सुभाष चोपडा, दत्ता माळी, भुषण आहिरे, कैलास चोथमल, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम आदींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *