Homeताज्या बातम्याबिटको महाविद्यालयात एनएसएस व एनसीसी वतीने रक्तदान शिबिर....
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

बिटको महाविद्यालयात एनएसएस व एनसीसी वतीने रक्तदान शिबिर….

नाशिकरोड गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात संस्थेचे माजी सचिव व महासंचालक तसेच ज्येष्ठ शिक्षणतज्ञ स्व. डॉ. मो. स. गोसावी यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी -एअर विंग व विद्यार्थी कल्याण मंडळ वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. अनिल कुमार पठारे, डॉ. आकाश ठाकूर, आयक्यूएसी समन्वयक डॉ. के. सी. टकले, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. संतोष पगार, डॉ. विजय सुकटे, डॉ. दीपक टोपे, माजी विद्यार्थी दीपक पाटील, डॉ. प्रकाश भवर, धनंजय जळूकर,सिनियर टेक्निशियन जयश्री पागेरे, डॉ. उत्तम करमाळकर, डॉ. सुधाकर बोरसे, डॉ. सागर चौधरी, प्रा. अनुराग रत्नपारखी, मुकुंद सोनवणे यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते . या रक्तदान शिबिरासाठी अर्पण रक्तपेढीचे सहकार्य लाभले . याप्रसंगी प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी आपल्या मार्गदर्शनात, ” रक्तदान श्रेष्ठदान असून त्याचे महत्त्व सांगतांना रक्तदानामुळे अनेकांना जीवनदान मिळते. त्यामुळे पेशंटचे प्राण वाचण्यास मदत होते. विशेषतः शरीरातील लोहाची पातळी विशिष्ट मर्यादेपर्यंत राहुन नवीन रक्तपेशी अधिक प्रमाणात निर्माण होतात. त्यामुळे रक्तदात्याचे आरोग्य सदृढ राहण्यास मदत होते, ” असे सांगितले. या शिबिरात एकूण ४० रक्त पिशव्या संकलित झाल्या .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments