ताज्या बातम्या धार्मिक

संत पहिलाजराम यांचा वार्षिक उत्सव निमित्त देवळाली कॅम्पला विविध कार्यक्रम….

संत पहिलाजराम यांचा वार्षिक उत्सव निमित्त देवळाली कॅम्पला विविध कार्यक्रम….

 

 

हिंदू सिंधी संत कविराज पहिलाजराम यांचा वार्षिक उत्सव साजरा करण्यात येणार आहे. वर्षाव उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

संत स्वामी कविराज पहिलाजराम यांचा 57 वा वार्षिक उत्सव गुरुवार 22, शुक्रवार 23 आणि शनिवार 24 मे रोजी देवळाली कॅम्प येथील बाबाजी का बाग, आनंद रोड, देवळाली कॅम्प याठिकाणी साजरा करण्यात येणार असून सकाळी 8 ते 9.30 आणि सायंकाळी 5.30 ते 8.30 यावेळेत भाविकांनी श्री गुरु ग्रंथ साहब जी आणि संत महात्म्यांचे दर्शन और प्रवचनांचे लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी खालील मोबाईल नंबरवर संपर्क करावे 9371531806 / 9423555143.

उत्सवात स्थानिक भाविकांसह इतर भागांतील श्रद्धाळूंचा मोठा सहभाग अपेक्षित आहे. संत कविराज पहिलाजराम यांची शिकवण आणि त्यांचे कार्य समाजात अध्यात्मिक उन्नतीचे प्रेरणास्थान ठरले असून, त्यांच्या स्मरणार्थ हा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *