Homeअपघातदारूच्या नशेत कार चालक धडकला दुभाजकला......पुणे अपघतासारखी घटना नाशिकरोडला...... पोलिस फिरकलेच...
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

दारूच्या नशेत कार चालक धडकला दुभाजकला……पुणे अपघतासारखी घटना नाशिकरोडला…… पोलिस फिरकलेच नाही

दारूच्या नशेत कार चालक धडकला दुभाजकला……पुणे अपघतासारखी घटना नाशिकरोडला…… पोलिस फिरकलेच नाही…….

काही दिवसांपूर्वी ओव्हरस्पीड असलेल्या पोर्श कारने पुण्यात दोन जणांवर धाव घेत जीव घेतले होते. मद्यपान करून वाहन चालवल्यामुळे देशात सर्वाधिक रस्ते अपघात आणि मृत्यू कसे होतात यावरून स्पष्ट होते. शुक्रवारी सायंकाळी नाशिकरोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळ एका कारने चालक युवकाने दारूच्या नशेत दुभाजकला जोरदार धडक दिल्याचे समजते. धडक इतकी जोरदार होती की कार चे बंपर बाहेर पडले होते, उजव्या बाजूने पुढील टायर फुटले होते.

मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी धाव घेऊन काय घडले जाणून घेण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्ष पाहणाऱ्या नागरिकांनी MH 15 HQ 2594 या कार चालक युवकाने दारूच्या नशेत दुभाजकला धडक दिल्याची माहिती दिली. सायंकाळी अचानक वर्दळीच्या ठिकाणी अपघाताची घटना घडल्याने एकच गर्दी होऊन काही काळ वाहतूक खोळंबली होती. अगदी जवळच 25 मितरवर असलेल्या पोलिस चौकी बंद होती. सायंकाळी गर्दीच्या वेळेस कुणीच कर्मचारी नसल्याने नागरिकांना प्रश्न पडला. नागरिकांनी पोलिसांना फोन केला पण पोलिस न आल्याने शेवटी नागरिकांनी मद्यापी कार चालक युवकाला बाहेर काढले आणि अपघातग्रस्त कार पेट्रोल पंप येथे ढकलून बाजूला केली. कार चालक युवक शुद्दित नसल्याने काही युवकांनी कार मध्ये असलेल्या युवकाच्या मोबाईल वरून त्याच्या संपर्कात असलेल्या क्रमांकावर फोन करून अपघाताची माहिती दिली. पुणे येथील घटना ताजी असताना सुद्धा वर्दळीच्या ठिकाणी पोलिस लक्ष देत नसल्याने एखाद्या मोठ्या अपघाताला निमंत्रण मिळाले असते. गर्दीच्या वेळेस मोठी वाहतूक असताना मध्यपी कार चालकाने दुभाजाकला कार ठोकली पण कार जर दुभाजकाला नसती ठोकली तर पुढे जाऊन मोठा अपघात होऊन एखद्याच्या जीवावर बेतले असते.

रात्री उशिरापर्यंत कार पेट्रोल पंप जवळच उभी होती. सायंकाळी परिसरात झालेला जोरदार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचलतलमुळे झालेली अडचण त्यात दारूच्या नशेत युवकाने ठोकलेली कार विशेष सायंकाळची वेळ वाहनांची गर्दी, अपघात त्यात पोलिस चौकी बंद, वाहतूक पोलिस नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली. एखादी घटना घडल्यानंतर त्याठिकाणी पोलिस बंदोबस्त देण्यापेक्षा वर्दळीच्या ठिकाणी अगोदरच उपाययोजना का करण्यात येत नाही असा सवाल नागरिक करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments