कुंभमेळा निमित्त मुख्यमंत्र्यांची बैठक संपन्न….. अमृत स्नानाच्या तारखा जाहीर…..
RELATED ARTICLES
कुंभमेळा निमित्त मुख्यमंत्र्यांची बैठक संपन्न….. अमृत स्नानाच्या तारखा जाहीर…..
कुंभमेळा निमित्त मुख्यमंत्र्यांची बैठक संपन्न….. अमृत स्नानाच्या तारखा जाहीर…..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सर्व आखाडा च्या महंत च्या उपस्थितीत रविवार 1 जून रोजी पहिली बैठक संपन्न झाली. यावेळी बैठकीत उपस्थित आखाड्यातील सर्व साधूंनी आपली भूमिका मांडली. कुंभमेळा ची कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
बैठकीत साधुग्राम ची जागा निश्चित करा, गोदावरी प्रदूषण मुक्त करा आदी प्रमुख मागणी करण्यात आली. शाही हा मुघल साम्राज्यशी निगडित शब्द आहे त्यामुळे प्रयाग राज कुंभमेळा पासून शाही स्नान ऐवजी अमृत स्नान असा उल्लेख केला जात आहे.
शाही मिरवणुकीला अमृत मिरवणूक असे संबोधले जाणार आहे. त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त अतिशय छोटी जागा असून कुंभमेळा साठी मोठ्या संख्येने भाविक येणार असून मोठी जागे बाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
नाशिक शहरात येणाऱ्या कुंभ मेळ्यासाठी 1500 एकर जागा आरक्षित करण्याची महंतांनी केली आहे. 31 ऑक्टोबर 2026 रोजी ध्वजारोहणाने कुंभमेळ्यास सुरुवात होणार आहे. त्र्यंबकेश्वर अमृत स्नान 2 ऑगस्ट 2027, 31 ऑगस्ट 2027, 12 सप्टेंबर 2027 रोजी होणार आहे तर नाशिक अमृत स्नान 2 ऑगस्ट 2027,031 ऑगस्ट 2027, आणि 11 सप्टेंबर 2027 रोजी होणार आहे. बैठकीत विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा पार पडली.
RELATED ARTICLES