झुलेलाल जयंती’ सिंधी बांधवांचा महाउत्सव
संसार भरातील सर्वच देशांमध्ये अनेक जाती प्रजाती अस्तित्वात आहेत, त्यांच्या आपल्या भाषा व उपभाषा आहेत. संस्कृती विशेष आहे. सर्वांचीच आपली मातृभाषा असते. त्याचप्रमाणे सिंधी समाजाची मातृभाषा सिंधी आहे. त्याप्रमाणे प्रत्येक समाजाची आपली भाषा व संस्कृती असते त्याचप्रमाणे सिंधी समाजाची आपली भाषा व एक संस्कृती आहे. प्राचीन काळापासून सिंधी समाज चैत्र महिन्यात चेटीचंडच्या पावन पर्वावर पुज्य झुलेलाल जयंती उत्साहात साजरी करत आला आहे.
सिंधी समाज हा अगदी शांत आणि संयमी असा समाज आहे. सिंधी समाजाचे इतिहास प्राचीन असे इतिहास आहे. सिंधी समाज भारतीयच आहे, काही लोकांची आजही मानसिकता हीच आहे की सिंधी समाज बाहेरून आलेला आहे. भारताची फाळणी झाली त्यावेळेस आपले घरेदारे, पैसा सर्वकाही सोडून आले. त्यांच्यावर अनेक प्रकारे अत्याचार झाले. शहीद हेमू कलानी सह अनेक शहिदांचा इतिहास आहे. एक रुपया खिशात नसतांना आपल्या मेहनतीच्या जोरावर आपल्या समाजाचे अस्तित्व निर्माण केले आहे. विभाजनानंतर भारतात आल्यानंतरही चेटीचंड हा उत्सव साजरा करण्याची परंपरा आजतागायत सुरू आहे. मागील काही दशकांपासून चेटीचंड उत्सव सिंधीयत जो डिंहुँ’ सिंधी दिवस च्या रूपाने साजरा केला जातो. याची अनेक कारणे आहेत, कारण प्राचीन संस्कृती मधून एक अशी सिंधी संस्कृती असून सिंधी समाजाचा मोठा हिस्सा आपल्या संस्कृतीपासून दुर होत चालला आहे. या सर्वांना परत आपल्या संस्कृतीत जोडण्यासाठीच चेटीचंड हा सिंधी दिवस म्हणून साजरा केला जातो.
देश विदेशात सिंधी भाषा व संस्कृतीसाठी सिंधी सम्मेलन व सिंधी सेमिनारांचे आयोजन केले जाते. सिंधी समाज शांत आणि संयमी असा समाज आहे. चैत्र पौर्णिमा हा दिवस गुढी पाडव्याचा दिवस व नववर्षाचा असून नवीन संस्कृतीचे भारतावर होणाऱ्या आक्रमणामुळे सर्वच चिंतेत आहेत. आता वेळ कोणतेही कष्ट किंवा जबाबदारी घेण्यास तत्पर असलेली व्यक्ती नक्कीच सिंधी हा समाजाची असेल हे चित्र कोणीही मनातून काढू शकणार नाही, ग्राहकांच्या वस्तू खरेदीचा खोलवर अभ्यास करून या समाजाने ग्राहकांच्या मनात जणू मोहीनीच घातली आहे. शिक्षण महर्षी धोंडू केशव कर्वे सतत म्हणत असत की, सिंधी समाज सर्वाधिक दयाळू व आदरातिथ्यशील असून जगातील प्रत्येक देशात सिंधी समाजाचे थोडेबहूत अस्तित्व दिसून येते. तसंच प्रभु रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नासिक नगरीतही त्याला अपवाद नाही.
नासिकरोड, नासिक शहर, देवळाली कॅम्प, उपनगर आदी भागांत हजारो सिंधी बांधव मिळून मिसळून राहतात. सिंधी बांधवांचे कुलदैवत असलेल्या पु. झुलेलाल भगवान यांच्या मंदिरात गेल्यावर आपणांस प्रभु श्रीरामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, माता दुर्गा, गरुनानक देवजी, महादेव आदी देवदेवतांच्या प्रतिमा बघावयास मिळतात. रेडीमेड कपडे, बांधकाम व्यवसाय, प्रोव्हीजन स्टोअर्स, हॉटेल्स, किराणा, सराफी आदी व्यवसायातून आपले बस्तान बसवून शहर व परिसरातील अर्थकारण सिंधी समाज बांधवांनी निर्णायक भुमिका बजावल्याचे सर्वज्ञात आहे. शहर परिसरात नासिक सिंधी पंचायत, पंचवटी सिंधी पंचायत, देवळाली सिंधी पंचायत, पुज्य झुलेलाल सिंधी सेवा मंडळ, सिंधी सोशल अॅन्ड कल्चरल असोसिएशन, झुलेलाल मित्र मंडळ, श्री छापरू पंचायत, झुलेलाल पंचायत, स्वामी शांतीप्रकाश संस्था पंचवटी, सिंधी साहित्य कला संग्राम, सिंधु शिक्षा साहित्य, सिंधी कौन्सिल ऑफ इंडिया, नासिक डिस्ट्रीक्ट सिंधी पंचायत आहेत. शिवाय आडवाणी, जव्हेरी, खट्टावरी, सेवाकुंज आदी सिंधी धर्मशाळा शहरात असून या विविध संस्थामार्फत सामाजिक गरजुंना सर्वसमावेशक मदत खुल्या दिलाने केली जाते. शांत व संयमी आदराशील वृतीच्या सिंधी बांधवांनी नासिककरांमध्ये तसेच संपुर्ण भारतामध्ये आपली वेगळीच प्रतिमा निर्माण केली आहे.
भारतातील प्रत्येक जाती धर्माची व्यक्ती ही उत्सवप्रिय असून आपापल्या परीने सणवार साजरा करतो. मग तो हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई किंवा कोणत्याही पंथाचा वा धर्माचा असो, तसेच आपले उत्सव आनंदाने साजरे करतात. गुढीपाढव्याच्या सणाप्रमाणेच सिंधी बांधव इस्टदेव पूज्य झुलेलाल यांचा अवतरण उत्सव चेटीचंड हा सण सिंधी दिवस म्हणून साजरा करतात, वर्ष सर्वांना सुख संपन्न व भरभराटीचे जावो ! हिच सदिच्छा !!