सिध्दार्थ नगर वसाहत कायम स्वरुपी करावी….. एक्लाहरे ग्रामपंचायत ला निवेदन……..
सिध्दार्थ नगर वसाहत एकलाहारे ग्रामपंचायत मध्ये कायम स्वरुपी सामील करण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने ग्रामपंचायतीला निवेदन. सिध्दार्थ नगर येथील रहिवाशी गेल्या ६० वर्षांपासून तात्पुरते घरे बांधून राहत असून सदर वसाहत अजून शासन दरबारी कायम स्वरुपी करण्यात आलेली नाही.
याठिकाणी राहणारे रहिवाशी अनु जाती व जमाती ई मागास वर्ग भटक्या विमुक्त आदिवासी जातीचे असून सिध्दार्थ नगर कायम स्वरुपी नसल्याने येथे नागरी सुविधा उपलब्ध होत नाही. सिध्दार्थ नगर मधील सर्व समस्या ग्रामपंचायतीने सोडवाव्यात अशी मागणी सुखदेव वारडे, रामा शिंदे, शांताराम कापसे, गणेश बचाटे, मुक्ताई खार्जुल, सुरेखा पगारे, सविता चंद्र मोरे, कांताबाई वारडे, भाग्यश्री जाधव आदींनी केली आहे.