क्राईम ताज्या बातम्या

सहा वर्षीय मुलीची हत्या करून पोलिसाची आत्महत्या

सहा वर्षीय मुलीची हत्या करून पोलिसाची आत्महत्या..

सहा वर्षीय मुलीची हत्या करून पोलिस कर्मचाऱ्याने स्वतः आत्महत्या केली.सहा वर्षाच्या चिमुकलीची गळफास देत हत्या झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतील जेलरोड परिसरात मॉडेल कॉलनी या ठिकाणी 34 वर्षीय स्वप्निल गायकवाड या पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःच्या सहा वर्षीय मुलीची हत्या करून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडल्याने नाशिकरोड परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्वप्निल गायकवाड हे  उपनगर पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते. आपल्या सहा वर्षीय भैरवी स्वप्निल गायकवाड या मुलीची गळफास देत हत्या केली व त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

स्वप्निल गायकवाड याचा घटस्फोट झाल्याने तो मानसिक रित्या अस्थिर असल्याचे देखील बोलले जात आहे. यातूनच त्याने आपल्या सहा वर्षीय मुलीची हत्या केली असावी.हत्या करत स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून हत्या व आत्महत्येचे मूळ कारण अद्याप अस्पष्ट असल्याने याबाबत अधिक तपास नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *