Homeक्राईममहिला डॉक्टरचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

महिला डॉक्टरचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक

नाशिक रोड प्रतिनिधी महापालिकेच्या नवीन बिटको हॉस्पिटलमध्ये एका महिला डॉक्टरला चाकूचा धाक दाखवून विनयभंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना नाशिक रोड पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा व विनयभंग करण्याचा प्रयत्न असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापालिकेच्या येथील बिटको हॉस्पिटलमध्ये एक महिला डॉक्टर ड्युटी करत असताना त्या ठिकाणी दोन युवक आले व त्यातील एकाने संबंधित महिला डॉक्टरला अश्लील हावभाव करून बोलले व विनयभंग करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर या दोघांना त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सिक्युरिटी गार्डने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता ते दोघे युवक पुन्हा आले व त्यांनी पुन्हा महिला डॉक्टरला अश्लील हावभाव करून बोलले व त्यानंतर त्यांच्या पाठीमागे जाऊन महिला डॉक्टरचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.

या घटनेनंतर संबंधित महिला डॉक्टरने आपल्या वरिष्ठांची संपर्क साधून पोलीस स्टेशनला फोन केला सदर काही वेळातच पोलीस घटनास्थळी आले व त्यांनी या दोघांना ताब्यात घेतले त्यापैकी एकाने चाकूचा धाक दाखवून आमच्या विरोधात तक्रार केली तर तुम्हाला महाग पडेल अशी धमकी दिली या दोघांची अधिक चौकशी केली असता त्यांची नावे आकाश चंद्रकांत नेवडे वय 28 राहणार बोराडे मळा जेलरोड नाशिक रोड व रहेमान जाफर शेख वय 22 राहणार राजवाडा देवळाली गाव नाशिक रोड असे असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले त्यानंतर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना अटक केली व त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा व विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी महिला डॉक्टरच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments