छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)

८५ कोटींचे भव्य ‘पीडब्ल्यूडी’ संकुल

सार्वजनिक बांधकाम विभागाची आणखी एक बहुमजली इमारत जालना रोडच्या सौंदर्यात भर घालणार आहे. हायकोर्टालगत असलेल्या विद्युत विभागाच्या जागेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे एकत्रित प्रशासकीय संकुल उभारण्यात येणार आहे. मुख्य अभियंत्यापासून सर्व अभियंते येथे असतील. विभागाचे एकत्रित प्रशासकीय संकुल म्हणून ती इमारत असणार आहे. बांधकाम मंत्री शिवेंद्रराजेसिंह भोसले यांनी सदरील इमारतीच्या डिझाईनला मंजुरी दिली आहे. इमारतीच्या कामासाठी पहिल्या टप्प्यात ८५ कोटींच्या अंदाजपत्रकाला मान्यता मिळाली आहे. बांधकाम विभागाचे सध्या चार कार्यालये शहरात आहेत. मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व सर्कलसह विद्युत विभाग मिळून चार कार्यालये आहेत. ही सर्व कार्यालय प्रशासकीय संकुलात एकाच ठिकाणी असणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *