ताज्या बातम्या नाशिक

दोन वर्षीय बालकावर बिबट्याचा हल्ला….. वडनेर दुमाला महिन्याभरात दुसरी घटना…..

दोन वर्षीय बालकावर बिबट्याचा हल्ला….. वडनेर दुमाला महिन्याभरात दुसरी घटना…..

वडनेरगेट येथे पुन्हा एकदा बिबट्याने एका दोन वर्षाच्या बालकावर हल्ला चढविला. श्रुतिक या बालकावर हल्ला करून बिबट्याने ओढून नेल्याचा प्रकार घडला असून घडलेल्या प्रकारामुळे परिसरात पुन्हा एकदा परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. श्रुतिक या बालकाचा शोध सुरू आहे.

Oplus_16777216

महिन्याभरापूर्वी वडनेर दुमाला येथे आयुष भगत या तीन वर्षाच्या बालकाचा बिबट्याने शेतात ओढून नेले होते त्यानंतर या हल्ल्यात आयुष्य याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर बिबट्याला पकडण्यासाठी माजी नगरसेवक केशव पोरजे यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. आता पुन्हा याच परिसरात असलेल्या वडनेर गेट परिसरातील कारगिल गेटच्या बाजूला असलेल्या क्वार्टर जवळ बिबट्याने दोन वर्षाच्या बालकाने हल्ला करून त्याला ओढत नेल्याने खळबळ उडाली आहे.

श्रुतिक या बालकाला बिबट्याने ओढून नेल्यानंतर परिसरातील नागरिक तसेच ग्रामस्थ त्याचप्रमाणे माजी नगरसेवक केशव पोरजे जगदीश पवार व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले असून बालकाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *