ताज्या बातम्या धार्मिक

नाशिकरोडला रावण दहन….. ४० फुटी रावणाचे होणार दहन…

नाशिकरोडला रावण दहन….. ४० फुटी रावणाचे होणार दहन…

नाशिकरोड परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य रावण दहन सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे.  गुरुवार दि. २ ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत नाशिकरोड येथील बिटको पॉईंट जवळ असलेल्या नाट्यगृह मैदानावर रावण दहनाचा कार्यक्रम होणार आहे.

यावेळी प्रमुख आकर्षण महाराष्ट्राचा शाहीर बाणा युवा शाहीर चंद्रकांत माने, सुप्रसिद्धगायक ऋषिकेश रिकामे उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात ४० फुटी रावणाचे दहन करण्यात येणार असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहेत.

धर्म आणि सत्याचा असत्यावर विजय या संदेशासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

रावण दहनाचा भव्य कार्यक्रम माजी स्थायी समिती सभापती गणेश भाऊ बबनराव गिते यांचे मार्गदर्शनाखाली आयोजीत गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब प्रतिष्ठान चे निलेश दिलीप शिरसाठ , आकाश गंगाधर उगले , सुदर्शन बबलूशेठ चंदनानी , दिपक ठाणगे , नितीन तौर , आकाश अष्टेकर, आदी कार्यक्रमासाठी प्रयत्नशील आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *