महिलेचा छळ….सहा महिन्यांनी गुन्हा दाखल…..
कामाच्या ठिकाणी मानसिक आणि लैंगिक छळाचा सामना करत असलेल्या पीडितेचा 6 महिन्यांनी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक शहरातील एका महिला कामगाराला कामाच्या ठिकाणी मानसिक आणि लैंगिक छळाचा सामना करावा लागला असून या संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पीडितेला तब्बल 6 महिने संघर्ष करावा लागला. पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामूळे पीडितेच्या तक्रारीकडे सातत्याने 6 महिने दुर्लक्ष होत होते.
तक्रारीत, पीडितेला तिच्या कामाच्या ठिकाणी वैयक्तिकरित्या त्रास देऊ लागल्याचे आढळले. तिच्या कामावर नजर ठेवणे, तिला टोमणा मारणे, लज्जास्पद मन दुखावेल असे बोलणे तसेच कामाच्या ठिकाणी सर्वांसमोर अपमानजनक वागणूक देऊन तिला असुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण केले.
याबाबत कोणाला सांगितले तरी काही होणार नाही, पिडीतेला कामावरून काढून टाकण्याची तसेच बदली करण्याची धमकी देण्यात येत होती. 28 जून 2025 रोजी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सरकारवाडा पोलीस करत आहे.