Featured क्राईम ताज्या बातम्या

व्यापारी बँकेचे डेली कलेक्शन करणाऱ्या प्रतिनिधीवर गुंडांचा हल्ला….. एक लाख रुपयांची लूट…..

व्यापारी बँकेचे डेली कलेक्शन करणाऱ्या प्रतिनिधीवर गुंडांचा हल्ला….. एक लाख रुपयांची लूट…..

75 हजार सभासद असलेल्या नाशिक शहराची आर्थिक नाडी असलेली नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेच्या डेली कलेक्शन करणाऱ्या एका अल्पबचत प्रतिनिधीवर जेलरोड येथे बुधवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास चार अज्ञात गुंडांनी हल्ला केला. प्रातिनिधिवर हल्ला करून त्याच्या जवळील सुमारे एक लाख पाच हजार रुपये लुटून गुंडांनी पळ काढला. गुंडांनी केलेल्या हल्ल्यात संबंधित अल्पबचत प्रतिनिधी हे गंभीर जखमी झाले आहे.

जितेंद्र बबनराव लोहारकर वय 51 राहणार शिवराम अपार्टमेंट सुवर्ण हाउसिंग सोसायटी जवळ आर्टिलरी सेंटर रोड नाशिक रोड हे नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेत गेल्या 32 वर्षापासून डेली कलेक्शनचे अल्पबचत प्रतिनिधी मधून काम करत असून बुधवारी दुपारी चार वाजेनंतर नाशिक रोड परिसरातील तसेच जेल रोड व इतर भागातील व्यापाऱ्यांच्या दुकानातील कलेक्शन करून रात्री पावणे बाराच्या सुमारास जेल रोड येथून बिटको चौक मार्गे घरी जात असताना कोठारी कन्या शाळेजवळ लोहारकर आले असता अचानकपणे त्यांच्यापुढे दुचाकी गाडीवर आलेल्या एकूण चार जणांनी लोहारकर यांना घेरले रस्त्यावर कोणी नसल्याचा फायदा घेऊन या चौघांनी लोहारकर यांच्याशी वाद घालून शिवीगाळ सुरू केली त्यानंतर आपल्याकडे असलेल्या धारदार शास्त्राने लोहारकर यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात लोहारकर यांच्या हाताला खांद्याला व पोटावर वार करून गंभीर जखमी केले त्यानंतर या चौघाही लुटारूंनी लोहारकर यांच्या जवळील बॅग मधील जमा झालेले कलेक्शन चे सुमारे एक लाख पाच हजार रुपये लुटून पलायन केले.

लोहारकर यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आहे. जितेंद्र लोहारकर यांच्या फि्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात चार अज्ञात गुंडा विरुद्ध तक्रार दाखल केली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी हे करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *