अपघात ताज्या बातम्या

बिटको चौकात ट्रकच्या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू

बिटको चौकात ट्रकच्या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू .

नाशिकरोड येथील बिटको चौक, पवन हॉटेल समोर रस्ता ओलांडताना तरुणीला मालवाहतूक ट्रकने जोरदार धडक दिल्याने तरुणी जागीच ठार झाली असून चेहऱ्यावरून चाक गेल्याने तिची ओळख पटू शकली नाही. नाशिकरोड येथील बिटको चौकात असलेल्या हॉटेल पवनच्या समोर एक महिला काल रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास उड्डाणपूल भाजी बाजार येथून रस्ता ओलांडत असताना तिला नाशिक कडून सिन्नर कडे जाणाऱ्या एन आय ०१ ए सी १०५१ या क्रमांकाच्या मालवाहतूक ट्रकने जोरदार धडक दिली. त्यामध्ये तरुणीच्या डोक्यावरून गाडीचे चाक गेल्याने व ती जागीच ठार झाली.


अपघातात तरुणीच्या चेहऱ्याला मार लागल्या असल्याने तिची ओळख पटू शकली नाही.
पुलाखाली असलेला बाजारातून भाजीपाला घेऊन अनेक नागरिकांना रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागते. पुलाखाली बाजारात जाताना काही ठिकाणी बाहेर पाडण्यासाठी लोखंडी बॅरिकेड्स काढण्यात आलेली आहेत ज्यामुळे अनेक वेळा किरकोळ अपघात होत असतात. नाशिकहून सिन्नरला जाताना बिटको चौकात व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात दिवसभर खाजगी बसेस याठिकाणी थांबत आल्यामुळे वाहतूक कोंडी होत असते. याठिकाणी असलेली खाजगी बस थांबा इतरत्र हलवून वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी होत आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतले असून अपघाताचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *