अकोला

अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा

उष्णतेच्या लाटेने विदर्भ होरपळून निघत असून रविवारी तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचला. देशात रविवारी सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमानअकोला आणि वर्धा येथे नोंदविण्यात आले. विदर्भातील सर्व शहरांचे तापमान ४१ अंशांच्या पुढे गेले असून नागपूर व अमरावती येथेही तापमान ४४ अंशांच्या वर नोंदविण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे आणि तापमानात सातत्याने […]

हिंगोली

परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव

हिंगोली/परभणी/नांदेड: मराठवाड्यातील हिंगोली, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांना आज, शनिवारी (दि. ११) सकाळी ८:४५ ते ८:४६ च्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. हा धक्का ४.७ रिश्टर स्केल असल्याची माहिती आहे. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली शहर, वसमत, औंढा आणि कळमनुरी तालुक्यात धक्के बसताच नागरिक घराबाहेर पडले. त्यानंतर लगेचच परभणी शहर व जिल्ह्याच्या काही भागांत आणि नांदेड जिल्ह्यातही […]

लातूर

कारसह साडेआठ लाखांचा गुटखा पकडला; एकाला अटक

गुटख्याची चाेरट्या मार्गाने वाहतूक करणाऱ्या एकाला तब्बल ८ लाख ५९ हजार ५६० रुपयांच्या मुद्देमालासह पकडण्यात आले. ही कारवाई विशेष पाेलिस पथकाने कासार शिरसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत केली. याबाबत कासार शिरसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिसांनी सांगितले की, शनिवार, १८ एप्रिल रोजी सकाळी ९:४५ वाजण्याच्या सुमारास पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाला एका पांढऱ्या रंगाच्या […]

बीड

गर्भपातानंतर रुग्णालयात धाव, डॉक्टरांच्या तत्परतेमुळे बालविवाहाचे क्रूर सत्य समोर; ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा

पोटात दुखू लागल्याने आणि अतिरक्तस्राव होत असल्याने सोलापूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या एका अल्पवयीन विवाहितेच्या उपचारादरम्यान बालविवाहाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयात कागदपत्रे तपासली असता पीडितेचे वय उघड झाले आणि तेथूनच कायद्याचा बडगा उगारला गेला. या प्रकरणी पतीसह दोन्ही कुटुंबांतील पाच जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायदा व ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा नोंदवून तो केज पोलिसांकडे […]

परभणी

परभणीत शिर्डी एक्सप्रेसवर दरोडा; सिग्नलची केबल कापून रेल्वे रोखली, महिलांचे दागिने ओरबाडले

मानवत (जि.परभणी) :परभणी-मनमाड रेल्वे मार्गावरील मानवत रोड रेल्वे स्थानकाजवळ गुरुवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी सिग्नल यंत्रणेत बिघाड करून साईनगर शिर्डी एक्सप्रेस (रेल्वे क्र. १७२०६) रोखली. रेल्वे थांबताच चोरट्यांनी जनरल डबा आणि आरक्षित डब्यात प्रवेश करून दोन महिला प्रवाशांचे सोन्याचे दागिने लंपास केले. (रेल्वे पोलिसांचे म्हणणे की चोरट्यांनी खालूनच खिडकीद्वारे चोरी केली. मात्र, रेल्वे प्लॅटफॉर्मवर आली […]

नांदेड

महामानवास अभिवादन : मध्यरात्री जयभीमच्या जयघोषाने नांदेड दणाणले…

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी मध्यरात्री नांदेड शहरात उत्साहाचे वातावरण होते. सामाजिक समता आणि न्याय या मूल्यांचा जागर करत भीम अनुयायांनी रेल्वेस्थानकासमोरील महामानवाच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी आणि ‘जय भीम’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. ज्ञानाचा प्रकाश जनमानसात पोहचवणाऱ्या बाबासाहेबांच्या स्मृतीला यावेळी विनम्र अभिवादन करण्यात […]

धाराशिव (उस्मानाबाद)

महिला गुत्तेदाराला ६ लाखांच्या खंडणीसाठी राॅड, काठीने मारहाण, ६ जणांविराेधात गुन्हा दाखल

सोलापूर-धुळे महामार्गालगत शासकीय वनात वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याचे काम सुरू असताना, महिला गुत्तेदाराकडे ६ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.पाेलिसांनी सांगितले, शोभा धोंडीराम जाधव (रा. परांडा) या महिला गुत्तेदार वनीकरण विभागात काम करत असताना, आरोपी राजू माने व पांडुरंग माने यांनी कामाच्या बदल्यात ६ लाख रुपयांची मागणी […]

जालना

समृद्धीवर ओव्हरटेकच्या नादात ट्रॅव्हल्स टेम्पोवर आदळली

जालना : ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एका भरधाव ट्रॅव्हल्सने आयशर टेम्पोला पाठीमागून दिलेल्या भीषण धडकेमुळे दोघे गंभीर, तर चौघे किरकोळ जखमी झाले. ही घटना बुधवारी सकाळी समृद्धी महामार्गावरील नागपूर कॅरिडॉरवरील केळी गव्हाण पांगरी शिवारात (चॅनल क्रमांक ३७७.४) घडली. विशेष म्हणजे अपघातग्रस्त ट्रॅव्हल्समध्ये ४९ प्रवासी होते. या भीषण अपघातात ट्रॅव्हल्स चालक अंकित कुशवाह (वय ३१) आणि नऊ […]

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)

८५ कोटींचे भव्य ‘पीडब्ल्यूडी’ संकुल

सार्वजनिक बांधकाम विभागाची आणखी एक बहुमजली इमारत जालना रोडच्या सौंदर्यात भर घालणार आहे. हायकोर्टालगत असलेल्या विद्युत विभागाच्या जागेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे एकत्रित प्रशासकीय संकुल उभारण्यात येणार आहे. मुख्य अभियंत्यापासून सर्व अभियंते येथे असतील. विभागाचे एकत्रित प्रशासकीय संकुल म्हणून ती इमारत असणार आहे. बांधकाम मंत्री शिवेंद्रराजेसिंह भोसले यांनी सदरील इमारतीच्या डिझाईनला मंजुरी दिली आहे. इमारतीच्या कामासाठी […]

सोलापूर

“मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण…!”

मला वाटते, खरातांचा (अशोक खरात) कुठेतरी काहीतरी एन्काऊंटर करतील, कारण खूप नावे समोर येणार आहेत. ज्यांच्याशी ते जोडले गेले आहेत. अशी शंका व्यक्त करत, आता जे सत्ताधारी आहेत, मंत्री आहेत, त्यांना घेऊनही ही नावे येणार आहेत, असा मोठा दावा काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केला. त्या सोलापूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन […]