वाशिम

शेतकऱ्याला अधिकाऱ्याने चक्क बुटाने केली मारहाण; अनुदानाबाबत विचारल्याने आला राग

मंगरुळपीर (वाशिम): तालुक्यातील गोगरी परिसरात मनरेगा योजनेंतर्गत संत्रा फळबागेचे अनुदान रखडल्याबाबत विचारणा करणाऱ्या शेतकऱ्याला तालुका कृषी अधिकाऱ्याने बुटाने व मातीच्या ढेकळाने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गोगरी येथील शेतकरी ऋषिकेश पवार यांनी दोन वर्षापूर्वी मनरेगा योजनेंतर्गत तीन एकर क्षेत्रावर संत्रा फळबाग लावली होती. या फळबागेसाठी शासनाकडून मिळणारे अनुदान चार महिन्यांपासून रखडल्याचा त्यांचा आरोप आहे. […]

वर्धा

राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?

गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना अखेर वर्ध्याचे खासदार अमर काळे यांनी पूर्णविराम दिला आहे. “विलीनीकरणाबाबत सध्या कोणतीही अधिकृत चर्चा सुरू नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी या अफवा फेटाळून लावल्या आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर या विषयाला पूर्णपणे वेगळे वळण मिळाल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे. खासदार अमर काळे […]

यवतमाळ

एसटीचा प्रवास महागला ! स्वच्छतेसाठी प्रवाशांकडूनच घेतले जातील दोन रुपये शिल्लक

एसटी बस, बसस्थानक, बसस्थानकाचा परिसर स्वच्छ ठेवण्याची महामंडळाची ऐपत नाही, असे अप्रत्यक्ष मान्य करत यासाठीच्या खर्चाचा भार प्रवाशांवरच टाकण्यात आला आहे. प्रत्येक तिकिटामागे आता दोन रुपये वसूल केले जाणार आहेत. १५ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. महामंडळाच्या गंगाजळीत या मार्गाने दररोज एक कोटी दहा लाख रुपयांची भर पडणार आहे. स्वच्छतेच्या बाबतीत एसटीची कायम […]

भंडारा

मोहफुल वेचायला गेलेली महिला वाघाच्या हल्ल्ल्यात ठार

भंडारा : तुमसर वन परिक्षेत्रातील धनेगाव जंगल परिसरात मोहफुले वेचण्यासाठी जंगलात गेलेल्या एका ५२ वर्षीय महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज शुक्रवारी सायंकाळी घडली. साधना सीताराम उईके (रा. धनेगांव) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ​मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, साधना उईके या , १७ एप्रिल रोजी सकाळी […]

बुलढाणा

माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती

भारत सरकारने वरिष्ठ भाजप नेते तथा माजी केंद्रीय रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशचे नवे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. महत्वाचे म्हणजे, भारत आणि बांगलादेश यांच्यात काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरू असताना आणि दोन्ही देश आपले संबंध संतुलित आणि मजबूत ठेवण्याचा प्रयत्न करत असताना, हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय, पश्चिम बंगालच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर […]

नागपूर

संघाच्या ‘झेड प्लस’ सुरक्षेचा खर्च वसूल करण्याची मागणी हायकोर्टाने फेटाळली

​नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पुरवण्यात येत असलेल्या ‘झेड प्लस-व्हीव्हीआयपी’ सुरक्षा कवचाचा खर्च सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून वसूल करण्यात यावा, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते ललन किशोर सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेली जनहित याचिका सोमवारी गुणवत्ताहीन ठरवून फेटाळण्यात आली. मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी हा निर्णय दिला. या मागणीसंदर्भात […]

चंद्रपूर

चंद्रपूर हादरले! डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती रॅलीतील थरार, डीजेत नाचताना वाद; मध्यस्थीसाठी गेलेल्या इसमाला चाकूने भोसकले

चंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना गांधी चौकात घडलेल्या धक्कादायक घटनेने शहर हादरले. डीजेवर नाचताना झालेल्या धक्काबुक्कीतून वाद चिघळल्याने मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या इसमाची पाच युवकांनी मिळून चाकूने भोसकून हत्या केली. या हल्ल्यात एक युवक गंभीर जखमी झाला आहे. रविकांत उर्फ रिक्की टेभूरकर (४०) असे मृताचे नाव असून अनिकेत ताराचंद गलबले (२१) […]

गोंदिया

एनएमसी झोनच्या त्या १५ नक्षलवाद्यांच्या कायदेशिर आत्मसमर्पणाची प्रक्रिया पूर्ण

मध्यप्रदेश महाराष्ट्र-छत्तीसगड झोनचे पूर्वाश्रमीचे प्रवक्ते विकास उर्फ अनंत नागपुरे यांच्यासह १४ स्त्री व पुरुष नक्षलवाद्यांनी गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. या नक्षलवाद्यांची कायदेशिर आत्मसमर्पणाची प्रक्रिया शुक्रवारी (दि.१७) जिल्हाधिकारी मंगेश गोंदावले यांच्या उपस्थित पार पडली. गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी १५ पूर्वाश्रमीच्या नक्षलवाद्यांचा कायदेशीररित्या समर्पणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचे पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात […]

गडचिरोली

चार शेकरूंसह उडणाऱ्या खारीची शिकार; बारा आरोपी अटकेत

: राज्यात दुर्मीळ असलेला राज्यप्राणी शेकरू, उडणारी खार व राज्यपक्षी हारावतासह दयाळ पक्ष्याची शिकार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश आलापल्ली वन विभागाने केला. रविवार, १९ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास जंगलात लपून बसलेल्या १२ शिकाऱ्यांना वनविभागाच्या पथकाने थरारक पाठलाग करून रंगेहाथ पकडले. आलापल्ली वन विभागाचे पथक गस्तीवर असताना शिकाऱ्यांची टोळी जंगलात लपून असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वन विभागाच्या […]

अमरावती

परतवाडा व्हिडिओ कांड : अल्पवयीन पीडितेचे बयाण नोंदवले, पण पोलिसांकडून कमालीची गोपनीयता !

संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या परतवाडा येथील लैंगिक अत्याचार, आक्षेपार्ह व्हिडीओ चित्रीकरण ते व्हिडीओ, फोटो सोशल व्हायरल केल्याच्या गंभीर प्रकरणात शनिवारी एका १५ वर्षीय पीडितेचे बयाण नोंदवण्यात आले. मात्र, या बयाणात पीडितेने नेमकी काय माहिती दिली आणि तिच्या बयाणानंतर पोलिस आता कोणती भूमिका घेणार, याबाबत रविवारी दिवसभर प्रशासनाने प्रचंड गोपनीयता बाळगली. १३ एप्रिल रोजी गुन्हा […]