भंडारा : तुमसर वन परिक्षेत्रातील धनेगाव जंगल परिसरात मोहफुले वेचण्यासाठी जंगलात गेलेल्या एका ५२ वर्षीय महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज शुक्रवारी सायंकाळी घडली. साधना सीताराम उईके (रा. धनेगांव) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, साधना उईके या , १७ एप्रिल रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास गावाशेजारील शेतशिवारात मोहफुले वेचण्यासाठी गेल्या होत्या. दुपार उलटूनही त्या घरी न परतल्याने कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी शोधमोहीम हाती घेतली असता गावाजवळील जंगल शिवारात त्यांचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला.

आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने ब्लु स्टार न्युज नाशिक आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.
