बुलढाणा

माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती

भारत सरकारने वरिष्ठ भाजप नेते तथा माजी केंद्रीय रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशचे नवे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. महत्वाचे म्हणजे, भारत आणि बांगलादेश यांच्यात काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरू असताना आणि दोन्ही देश आपले संबंध संतुलित आणि मजबूत ठेवण्याचा प्रयत्न करत असताना, हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय, पश्चिम बंगालच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने खेळलेली ही एक धोरणात्मक खेळी असल्याचे बोलले जात आहे.

असा आहे दिनेश त्रिवेदी यांचा राजकीय प्रवास –
भाजपमध्ये येण्यापूर्वी दिनवेश त्रीवेदी है तृणमूल काँग्रेसमध्ये होते. ते युपीए सरकारमध्ये रेल्वेमंत्रीही राहिले आहेत. २०२१ मध्ये त्यांनी ममता बॅनर्जी यांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. आता ते प्रणय वर्मा यांची जागा घेतील. प्रणय वर्मा यांची नियुक्ती आता ब्रसेल्स येथे युरोपियन युनियनमध्ये भारताचे राजदूत म्हणून करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *