नंदुरबार

हसन मुश्रीफ यांच्याकडे नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्रिपद

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे बुधवारी नंदुरबारचे पालकमंत्रिपद सोपविण्यात आले. राज्यात नव्याने महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर मुश्रीफ यांच्याकडे कोणत्याच जिल्ह्याचे पालकमंत्रिपद दिले नव्हते. मंत्री मुश्रीफ यांनी यापूर्वी कोल्हापूरसह अहिल्यानगर, वाशिम, रत्नागिरी व बुलढाणा या जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद भूषविले आहे. आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या आहेत. तोंडावर १ मे आहे. शिवाय नवीन आर्थिक वर्ष […]

धुळे

जिच्यासोबत प्रेमसंबंध तिच्याच पतीने दगडाने ठेचले, अनोळखी मृतदेहाची टॅटूमुळे पटली ओळख

धुळे तालुक्यातील दिवाणमळा शिवारात विहिरीत कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या रवी मालचे याने आत्महत्या केली की, त्याची हत्या करण्यात आली, याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधाच्या रागातून महिलेच्या पतीनेच प्रियकराचा दगडाने ठेचून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. तपासातून ही हत्या असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. २६ मार्च रोजी दिवाणमळा येथील एमआयडीसी परिसरात […]

जळगाव

पेट्रोलसाठी पहाटे ५ पासून नागरिक रांगेत, चिंता वाढली!

आखातातील युद्धाची झळ बसत असतानाही भारतात सध्या पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू आहे, असे प्रशासनाकडून वारंवार सांगितले जात आहे, तरी पेट्रोल-डिझेल संपल्याच्या अफवांमुळे देशात काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोलपंपांवर नागरिकांनी सोमवारी रात्री आणि मंगळवारीही रांगा लावल्या होत्या. त्यामुळे काही ठिकाणी पेट्रोलपंप बंद करावे लागले, तर काही ठिकाणी वादावादीच्या घटनाही घडल्या. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पेट्रोलपंपांवर तुफान गर्दी उसळली. उन्हाच्या […]

जळगाव

“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत

अवकाळी पावसाने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, सरकारने आणि पालकमंत्र्यांनी तातडीने संवेदना व्यक्त केल्या पाहिजे. मात्र तसे दिसत नाही, शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, मात्र तशी सरकार पावले उचलत असल्याचे दिसत नाही, सरकार असंवेदनशील आहे. चोवीस तास राजकारण करणारे कुठे आहेत. संकट मोचक गिरीश महाजन, ते केवळ राजकीय संकट मोचक आहेत का? शेतकऱ्यांच्या वेळी कुठे आहेत, आमदार […]

जळगाव

शासकीय विश्रामगृहात मुक्कामाला आला बिबट्या, मुक्ताईनगरमध्ये धांदल, तब्बल तीन तासांनंतर जेरबंद

मुक्ताईनगर (जि. जळगाव) – मुक्ताईनगर शहरात रविवारी बिबट्याचा थरार पाहायला मिळाला. शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या शासकीय विश्रामगृहात सकाळी ९ वाजता चक्क बिबट्या आढळून आला. शहरात एकच खळबळ उडाली. वनविभागाचे पथक रेस्क्यू ऑपरेशन करीत असताना त्यांची बिबट्याशी झटापट झाली. झटापटीतच त्याला इंजेक्शन देत तीन तासांनंतर जेरबंद करण्यात आले. – रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास विश्रामगृहाच्या डायनिंग […]

सिंधुदुर्ग

वाळू माफियांचा ‘खेळ खल्लास’, प्रशासनाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ खास; रात्रभर चाललेल्या मोहिमेत १५ वाहने जप्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात फोफावलेल्या अवैध वाळू वाहतुकीच्या तक्रारींची जिल्हा प्रशासनाने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने समन्वयाची भूमिका बजावत एका अत्यंत नियोजित ‘सर्जिकल स्ट्राईक’द्वारे वाळू माफियांना मोठा दणका दिला आहे. जिल्हा प्रशासनाच्या या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. अवैध वाळू उपसा आणि […]

रायगड

‘तिसऱ्या मुंबई’साठी भू-संपादन सुरू, एमएमआरडीए ऑनलाइन पद्धतीने घेणार जमीन मालकांची संमती

मुंबई – अटल सेतू प्रकल्पाच्या प्रभाव क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या तिसऱ्या मुंबईच्या भूसंपादनाची प्रक्रिया मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरू केली आहे. त्यानुसार भूसंपादनासाठी जमीन मालकांची संमती घेण्याची प्रक्रिया २७ एप्रिलपासून सुरू केली जाणार असून त्यासाठी ऑनलाइन अर्ज संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाणार आहे. अटल सेतू प्रकल्पाच्या नवी मुंबई बाजूकडील प्रभाव क्षेत्रातील रायगड जिल्ह्यातील उरण, […]

रत्नागिरी

डंपरला विजेच्या तारेचा स्पर्श, चालकाचा जागीच मृत्यू; दापोलीतील घटना

दापोली : डंपरला विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याचे चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. ३१) दुपारी १२:३० वाजण्याच्या दरम्यान दापाेलीतील जानाई मंदिर परिसरात घडली. अश्फाक हुसेन अराई (६०, रा. ताडील माेहल्ला, दापाेली) असे या चालकाचे नाव आहे. दापोली शहरातील माैजे दापाेलीतील जानाई मंदिर परिसरात रस्त्याच्या कामासाठी डंपरच्या साहायाने मातीचा भराव टाकण्याचे काम सुरू होते. […]

मुंबई शहर

मुंबई पोलिस इतके असहाय कसे? मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल

मुंबई – पाली विभागाला अनुदानित दर्जा देण्याच्या मागणीसाठी मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये गेले कित्येक महिने आंदोलन करणाऱ्या बौद्ध भिक्खूला हटविण्यात पोलिस अपयशी ठरल्याने मुंबई उच्च न्यायालयाने पोलिस इतके असहाय कसे? असा सवाल गुरुवारी केला. मुंबई विद्यापीठातील पाली भाषा विभागाचे संवर्धन आणि वसतिगृहाच्या मागणीसाठी संशोधक विद्यार्थी तथा बौद्ध भिक्खू भंते विमांसा (राजेश बलखंडे) यांनी सप्टेंबर २०२५ […]

मुंबई उपनगर

आता लक्ष अक्षय्य तृतीयेकडे, कोट्यवधींची गुंतवणूक अडकली; ऑफर्सवर भर

घरांना ग्राहकांचा कमी प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर विविध ऑफर्सच्या माध्यमातून विक्री वाढवण्यासाठी आता विकासकांचे लक्ष अक्षय्य तृतीयेकडे लागले आहे. विकासकांची कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक अडकली असून, शिल्लक घरे विकण्यासाठी विकासकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. सिडकोच्या मास हाैसिंग योजनेमुळे खासगी प्रकल्पांना मोठा फटका बसला आहे. परवडणाऱ्या दरात घरे, पारदर्शक प्रक्रिया आणि मोठ्या प्रमाणावर उपलब्धता […]