धुळे

जिच्यासोबत प्रेमसंबंध तिच्याच पतीने दगडाने ठेचले, अनोळखी मृतदेहाची टॅटूमुळे पटली ओळख

धुळे तालुक्यातील दिवाणमळा शिवारात विहिरीत कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या रवी मालचे याने आत्महत्या केली की, त्याची हत्या करण्यात आली, याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधाच्या रागातून महिलेच्या पतीनेच प्रियकराचा दगडाने ठेचून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. तपासातून ही हत्या असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

२६ मार्च रोजी दिवाणमळा येथील एमआयडीसी परिसरात असलेल्या एका विहिरीत ३५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. सुरुवातीला हा प्रकार आत्महत्या असल्याचा बनाव रचण्यात गेला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *