सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात फोफावलेल्या अवैध वाळू वाहतुकीच्या तक्रारींची जिल्हा प्रशासनाने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने समन्वयाची भूमिका बजावत एका अत्यंत नियोजित ‘सर्जिकल स्ट्राईक’द्वारे वाळू माफियांना मोठा दणका दिला आहे. जिल्हा प्रशासनाच्या या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.
अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी विशेष धोरण आखले होते. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या तहसीलदारांना समन्वयाने कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. यात सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील, वैभववाडीचे सूर्यकांत पाटील, कणकवलीचे दीक्षात देशपांडे, मालवणचे गणेश लव्हे, वेंगुर्ल्याचे ओंकार ओतारी आणि कुडाळचे सचिन पाटील यांच्या पथकांनी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत अत्यंत गुप्तपणे ही मोहीम राबवली.

आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने ब्लु स्टार न्युज नाशिक आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.
