दापोली : डंपरला विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याचे चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. ३१) दुपारी १२:३० वाजण्याच्या दरम्यान दापाेलीतील जानाई मंदिर परिसरात घडली. अश्फाक हुसेन अराई (६०, रा. ताडील माेहल्ला, दापाेली) असे या चालकाचे नाव आहे.
दापोली शहरातील माैजे दापाेलीतील जानाई मंदिर परिसरात रस्त्याच्या कामासाठी डंपरच्या साहायाने मातीचा भराव टाकण्याचे काम सुरू होते. डंपरमधील माती खाली करत असताना गाडीचा हाैदा वर उचलला गेला आणि त्याचा स्पर्श वरून जाणाऱ्या उच्चदाब वीजवाहिनीला झाला. यामुळे डंपरमध्ये विद्युतप्रवाह उतरला आणि चालक अश्फाक अराई याला विजेचा धक्का बसला.
या घटनेनंतर चालक अराई याला तातडीने उपचारांसाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयात गर्दी केली हाेती. या अपघातप्रकरणी दापोली पोलिस अधिक तपास करत आहेत.

आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने ब्लु स्टार न्युज नाशिक आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.
