जळगाव

शासकीय विश्रामगृहात मुक्कामाला आला बिबट्या, मुक्ताईनगरमध्ये धांदल, तब्बल तीन तासांनंतर जेरबंद

मुक्ताईनगर (जि. जळगाव) – मुक्ताईनगर शहरात रविवारी बिबट्याचा थरार पाहायला मिळाला. शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या शासकीय विश्रामगृहात सकाळी ९ वाजता चक्क बिबट्या आढळून आला. शहरात एकच खळबळ उडाली. वनविभागाचे पथक रेस्क्यू ऑपरेशन करीत असताना त्यांची बिबट्याशी झटापट झाली. झटापटीतच त्याला इंजेक्शन देत तीन तासांनंतर जेरबंद करण्यात आले.

– रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास विश्रामगृहाच्या डायनिंग हॉलच्या खाली, भिंतीच्या आडोशाला एक बिबट्या आढळून आला. शहरात बिबट्या आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि बघ्यांची मोठी गर्दी जमली.
– विश्रामगृहाला लागूनच असलेले बसस्थानक पूर्णपणे खाली करण्यात आले. तसेच विश्रामगृहाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले. बाहेर असलेला गोंधळ पाहून दुपारी १२:३० वाजता बिबट्या विश्रामगृहातून धूम ठोकून पळाला.
– विश्रामगृहातून तो थेट बसस्थानकाकडे पळाला. त्याच्यामागे वनविभागाचे पथक, आमदार आणि त्यामागे जमाव पळू लागला. शेवटी बसस्थानकाजवळच पथक आणि बिबट्या यांच्यात झटापट झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *