जळगाव

“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत

अवकाळी पावसाने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, सरकारने आणि पालकमंत्र्यांनी तातडीने संवेदना व्यक्त केल्या पाहिजे. मात्र तसे दिसत नाही, शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, मात्र तशी सरकार पावले उचलत असल्याचे दिसत नाही, सरकार असंवेदनशील आहे. चोवीस तास राजकारण करणारे कुठे आहेत. संकट मोचक गिरीश महाजन, ते केवळ राजकीय संकट मोचक आहेत का? शेतकऱ्यांच्या वेळी कुठे आहेत, आमदार पळविणे हेच काम संकट मोचकाच आहे का, असा रोखठोक सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना अनेक विषयांवर प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस यांनी कठोर भूमिका घेतली आहे. पोलिसांनी योग्य तपास केला आहे, संदीप कर्णिक यांच्यामुळे अशोक खरात लंगडताना दिसला, गृहखाते काय तपास करते, त्यात कोणाला सोडले, अडकवले यावर बोलता येईल, एसआयटी उत्तम काम करत आहे. या प्रकरणात सुषमा अंधारे आणि रोहित पवार यांच्यामध्ये असलेल्या माहितीमध्ये तफावत आहे, माझ्याजवळ अधिक माहिती नसल्याने मी याबाबत बोलू इच्छित नाही, आसाराम बापू मुक्त आहेत, राम रहीम मुक्त आहे, निवडणुकीसाठी त्याला बाहेर आणले गेले होते, अशा सरकारकडून काय अपेक्षा करणार, अशी टीका संजय राऊतांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *