पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून काल भाषण केले,ते देशाच्या पंतप्रधानांचे नव्हते तर भाजपच्या नेत्याचे आणि आचारसंहितेचे उल्लंघन करणारे भाषण होते, अशी जोरदार टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. पाच राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने रचलेल्या कट कारस्थानांचा’वर विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधला. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना पंतप्रधानांनी आपल्या भाषणात ५० हून […]
Month: April 2026
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
उद्धवसेना, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा आम्ही उघड करू. आम्ही महिलांचे एकत्रीकरण करणार आहोत. लोकशाहीत जनमताचा रेटा यांच्या लक्षात येईल, तेव्हा हे महिला आरक्षणाला पाठिंबा देतील. महिलांना संघटित करण्याचे काम करण्यासह राज्यातून १ कोटी महिलांच्या सह्या गोळा करणार आहोत, जनजागृती करणार आहोत. आम्ही मेळावा बोलावला आहे. तिथे आमच्या मित्र पक्षांना निमंत्रित […]
महिला आरक्षण: सुप्रिया सुळेंनी CM फडणवीसांचे आव्हान स्वीकारले; म्हणाल्या, “वेळ-जागा सांगा”
मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणचा संबध काय? ५४३ सदस्यांमध्ये महिला आरक्षण द्या. आम्ही त्याचा विरोध कधीच करणार नाही. अनेक देशात सध्या अराजकता माजली आहे, त्यात तुम्ही विधेयक आणले. महिला आरक्षणाला आमचा विरोध नाहीच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत या विषयाच्या संदर्भात डिबेट करायला तयार आहे. त्यांनी जी जागा सांगावी आणि वेळ सांगावी, असे सांगत शरद […]
शेतकऱ्याला अधिकाऱ्याने चक्क बुटाने केली मारहाण; अनुदानाबाबत विचारल्याने आला राग
मंगरुळपीर (वाशिम): तालुक्यातील गोगरी परिसरात मनरेगा योजनेंतर्गत संत्रा फळबागेचे अनुदान रखडल्याबाबत विचारणा करणाऱ्या शेतकऱ्याला तालुका कृषी अधिकाऱ्याने बुटाने व मातीच्या ढेकळाने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गोगरी येथील शेतकरी ऋषिकेश पवार यांनी दोन वर्षापूर्वी मनरेगा योजनेंतर्गत तीन एकर क्षेत्रावर संत्रा फळबाग लावली होती. या फळबागेसाठी शासनाकडून मिळणारे अनुदान चार महिन्यांपासून रखडल्याचा त्यांचा आरोप आहे. […]
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना अखेर वर्ध्याचे खासदार अमर काळे यांनी पूर्णविराम दिला आहे. “विलीनीकरणाबाबत सध्या कोणतीही अधिकृत चर्चा सुरू नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी या अफवा फेटाळून लावल्या आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर या विषयाला पूर्णपणे वेगळे वळण मिळाल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे. खासदार अमर काळे […]
एसटीचा प्रवास महागला ! स्वच्छतेसाठी प्रवाशांकडूनच घेतले जातील दोन रुपये शिल्लक
एसटी बस, बसस्थानक, बसस्थानकाचा परिसर स्वच्छ ठेवण्याची महामंडळाची ऐपत नाही, असे अप्रत्यक्ष मान्य करत यासाठीच्या खर्चाचा भार प्रवाशांवरच टाकण्यात आला आहे. प्रत्येक तिकिटामागे आता दोन रुपये वसूल केले जाणार आहेत. १५ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. महामंडळाच्या गंगाजळीत या मार्गाने दररोज एक कोटी दहा लाख रुपयांची भर पडणार आहे. स्वच्छतेच्या बाबतीत एसटीची कायम […]
मोहफुल वेचायला गेलेली महिला वाघाच्या हल्ल्ल्यात ठार
भंडारा : तुमसर वन परिक्षेत्रातील धनेगाव जंगल परिसरात मोहफुले वेचण्यासाठी जंगलात गेलेल्या एका ५२ वर्षीय महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज शुक्रवारी सायंकाळी घडली. साधना सीताराम उईके (रा. धनेगांव) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, साधना उईके या , १७ एप्रिल रोजी सकाळी […]
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती
भारत सरकारने वरिष्ठ भाजप नेते तथा माजी केंद्रीय रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशचे नवे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. महत्वाचे म्हणजे, भारत आणि बांगलादेश यांच्यात काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरू असताना आणि दोन्ही देश आपले संबंध संतुलित आणि मजबूत ठेवण्याचा प्रयत्न करत असताना, हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय, पश्चिम बंगालच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर […]
संघाच्या ‘झेड प्लस’ सुरक्षेचा खर्च वसूल करण्याची मागणी हायकोर्टाने फेटाळली
नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पुरवण्यात येत असलेल्या ‘झेड प्लस-व्हीव्हीआयपी’ सुरक्षा कवचाचा खर्च सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून वसूल करण्यात यावा, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते ललन किशोर सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेली जनहित याचिका सोमवारी गुणवत्ताहीन ठरवून फेटाळण्यात आली. मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी हा निर्णय दिला. या मागणीसंदर्भात […]
चंद्रपूर हादरले! डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती रॅलीतील थरार, डीजेत नाचताना वाद; मध्यस्थीसाठी गेलेल्या इसमाला चाकूने भोसकले
चंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना गांधी चौकात घडलेल्या धक्कादायक घटनेने शहर हादरले. डीजेवर नाचताना झालेल्या धक्काबुक्कीतून वाद चिघळल्याने मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या इसमाची पाच युवकांनी मिळून चाकूने भोसकून हत्या केली. या हल्ल्यात एक युवक गंभीर जखमी झाला आहे. रविकांत उर्फ रिक्की टेभूरकर (४०) असे मृताचे नाव असून अनिकेत ताराचंद गलबले (२१) […]









