राजनिती

“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस

उद्धवसेना, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा आम्ही उघड करू. आम्ही महिलांचे एकत्रीकरण करणार आहोत. लोकशाहीत जनमताचा रेटा यांच्या लक्षात येईल, तेव्हा हे महिला आरक्षणाला पाठिंबा देतील. महिलांना संघटित करण्याचे काम करण्यासह राज्यातून १ कोटी महिलांच्या सह्या गोळा करणार आहोत, जनजागृती करणार आहोत. आम्ही मेळावा बोलावला आहे. तिथे आमच्या मित्र पक्षांना निमंत्रित करू. महिलांना आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री फडणवीस पत्रकार परिषदेत बोलत होते.

महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक संसदेत नामंजूर झाल्याच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका मांडली. गृहमंत्र्यांनी सांगितले आम्ही बदल करतो, तुम्ही पाठिंबा द्यावा. विरोधकांची बोलती बंद झाली. भाजपावर आरोप केले. राजस्थान, गुजरात, दिल्ली अशा ठिकाणी भाजपाने महिला मुख्यमंत्री दिले . या लोकांनी कधीही याठिकाणी महिलांना मुख्यमंत्री बनू दिले नाहीत. माझ्या स्तरावरील कोणत्याही नेत्याने माझ्याशी खुली चर्चा करावी. माझे आव्हान आहे. मात्र, ते करणार नाहीत. ते पळून जातात, असा टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *