राजनिती

“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून काल भाषण केले,ते देशाच्या पंतप्रधानांचे नव्हते तर भाजपच्या नेत्याचे आणि आचारसंहितेचे उल्लंघन करणारे भाषण होते, अशी जोरदार टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. पाच राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने रचलेल्या कट कारस्थानांचा’वर विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधला.

महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना पंतप्रधानांनी आपल्या भाषणात ५० हून अधिकवेळा काँग्रेसचे नाव घेतले. यावरून भाजपला काँग्रेसची किती भीती वाटते हे स्पष्ट होते. पंतप्रधानांचे हे भाषण राजकीय प्रचारासारखे असून त्यांनी आचारसंहितेच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. काँग्रेसने देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती, पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष आणि महिला पंतप्रधान दिल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षणही काँग्रेसनेच दिले. २०२३ मध्ये मंजूर झालेल्या महिला आरक्षण विधेयकाची अंमलबजावणी ‘मतदारसंघांची पुनर्रचना’ होईपर्यंत रोखून धरण्याचे कारण काय? भाजपाचा हा सत्ता कायम हातात ठेवण्यासाठी रचलेला एक कुटिल डाव होता जो विरोधकांनी हाणून पाडला, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *