क्राईम ताज्या बातम्या

विनापरवाना मिरवणूक….. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल…..

विनापरवाना मिरवणूक….. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल…..

विनापरवाना मिरवणुक काढल्याने तिघांविरुद्ध नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकरोड येथील सैलानी बाबा याठिकाणी 17 सप्टेंबर रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास सैलानी बाबा नाशिक रोड नाशिक येथील हिंद शक्ती मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सवाचे पदाधिकारी मंगेश वसंत गवारे व विवेक लाल बेग दोन्ही राहणार पवारवाडी जेलरोड नाशिक रोड आणि इतर सदस्यांनी वाहन क्रमांक एम एच 20 ए टी 86 27 साऊंड सिस्टिमचे मालक शुभम पोपट बर्डे राहणार ओझर मिग नाशिक यांनी विनापरवाना विसर्जन मिरवणूक काढल्याने विशाल वसंत साळुंखे यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक भोळे करीत आहेत. मंगेश वसंत गवारे, विवेक लाल बेग हे हिंदशक्ती मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सवाचे पदाधिकारी आहेत तर
शुभम पोपट बर्डे साऊंड सिस्टिम मालक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *