अर्भक मृत्यू प्रकरणात जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉ. चांदसाहेब शिकलगार यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, जिल्हा शासकीय रुग्णालयात १६ मार्च २०२६ रोजी एका १६ वर्षांच्या मुलीला गर्भपात करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी गर्भपात प्रक्रियेदरम्यान जिवंत बाळाचा […]
Day: April 20, 2026
अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर: सांगलीत ‘स्वीकृत’वरून राष्ट्रवादीच्या ३५ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
सांगली : महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवपदासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षांत नाराजी उफाळून आली आहे. राष्ट्रवादीकडून अशोक मासाळे यांना संधी दिल्याने शहर जिल्हा कार्यकारणीच्या ३५ पदाधिकार्यांनी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्याकडे रविवारी राजीनामे दिले. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकपदावरून राष्ट्रवादीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. दिवगंत अजित पवार यांच्या मृत्यूचा काही जणांना धाक राहिला नसल्याने असे प्रकार होत आहेत. या […]
वर्षात साडेपाच हजार पुणेकरांनी काढला आंतरराष्ट्रीय वाहन परवाना; परदेशात ड्रायव्हिंगची वाढली क्रेझ
: परदेशात स्वतः वाहन चालवत पर्यटन करण्याकडे पुणेकरांचा कल वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे. पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून २०२५-२६ या आर्थिक वर्षात तब्बल ५ हजार ५५८ नागरिकांनी आंतरराष्ट्रीय वाहन परवाना (आयडीपी) काढला असून, ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे अडीचशेने वाढली आहे. पुण्यातून परदेशात नोकरी, शिक्षण आणि पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे परदेशात […]
“…तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल”; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
भोंदू अशोक खरातला पाचव्या गुन्ह्यात रविवारी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. खरातला व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. लैंगिक शोषण आणि फसवणूकप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी खरातच्या खांद्याची सर्जरी झाली असून, त्याचं डोकंही दुखत आहे. पेनकिलर गोळ्या, औषधांनी त्याला फारसा फरक पडत नसल्याने आता वैद्यकीय तपासणीसाठी मेंदूविकार तज्ज्ञांकडे घेऊन जावे लागल्यास नवीन अर्ज करण्याची […]
“लग्नानंतर रात्री कशात व्यस्त असतेस?” चौथ्या पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब
कॉर्पोरेट विश्वाला हादरवून सोडणाऱ्या नाशिकच्याटाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लैंगिक छळवणूक आणि धर्मांतरण प्रकरणात पोलिसांनी पाचवा संशयित आरोपी रझा मेमन याला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणातील चौथ्या पीडित महिलेने समोर येऊन आपला जबाब नोंदवला असून, त्यातून कंपनीतील वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांच्या विकृत मानसिकतेचा पर्दाफाश झाला आहे. “हा विषय आपल्या दोघांमध्येच गुपित ठेव,” असे म्हणत रझा मेमनने या […]
विधान परिषद निवडणूक: मविआमध्ये एकमत होण्याजोगी स्थिती नाही- चंद्रशेखर बावनकुळे
कोल्हापूर :महाविकास आघाडीला एकच जागा विधान परिषदेसाठी मिळणार आहे. त्यामुळे आघाडीने ही जागा उद्धव ठाकरे यांना द्यायची की आणखी कोणाला हे ठरवायचे आहे. आघाडीतील सध्याची स्थिती एकमत होण्याजोगी नाही, असे मत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. ते कोल्हापूर विमानतळावर शुक्रवारी पत्रकारांशी बोलत होते. मंत्री बावनकुळे म्हणाले, प्यारेखानप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री म्हणून माझेही […]
भोंदू खरातच्या ट्रस्टवरील विश्वस्त जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू
कोपरगाव (जि. अहिल्यानगर) – येथील प्रसिद्ध उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. जितेंद्र गणपतराव शेळके आणि त्यांच्या पत्नी अनुराधा शेळके यांचा समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. शेळके हे भोंदू अशोक खरात यांच्या शिवनिका ट्रस्टवर उपाध्यक्ष व विश्वस्त म्हणून कार्यरत होतेे. छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे कारने येताना कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात शुक्रवारी दुपारी हा अपघात झाला. या […]
हसन मुश्रीफ यांच्याकडे नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्रिपद
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे बुधवारी नंदुरबारचे पालकमंत्रिपद सोपविण्यात आले. राज्यात नव्याने महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर मुश्रीफ यांच्याकडे कोणत्याच जिल्ह्याचे पालकमंत्रिपद दिले नव्हते. मंत्री मुश्रीफ यांनी यापूर्वी कोल्हापूरसह अहिल्यानगर, वाशिम, रत्नागिरी व बुलढाणा या जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद भूषविले आहे. आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या आहेत. तोंडावर १ मे आहे. शिवाय नवीन आर्थिक वर्ष […]
जिच्यासोबत प्रेमसंबंध तिच्याच पतीने दगडाने ठेचले, अनोळखी मृतदेहाची टॅटूमुळे पटली ओळख
धुळे तालुक्यातील दिवाणमळा शिवारात विहिरीत कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या रवी मालचे याने आत्महत्या केली की, त्याची हत्या करण्यात आली, याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधाच्या रागातून महिलेच्या पतीनेच प्रियकराचा दगडाने ठेचून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. तपासातून ही हत्या असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. २६ मार्च रोजी दिवाणमळा येथील एमआयडीसी परिसरात […]
पेट्रोलसाठी पहाटे ५ पासून नागरिक रांगेत, चिंता वाढली!
आखातातील युद्धाची झळ बसत असतानाही भारतात सध्या पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू आहे, असे प्रशासनाकडून वारंवार सांगितले जात आहे, तरी पेट्रोल-डिझेल संपल्याच्या अफवांमुळे देशात काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोलपंपांवर नागरिकांनी सोमवारी रात्री आणि मंगळवारीही रांगा लावल्या होत्या. त्यामुळे काही ठिकाणी पेट्रोलपंप बंद करावे लागले, तर काही ठिकाणी वादावादीच्या घटनाही घडल्या. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पेट्रोलपंपांवर तुफान गर्दी उसळली. उन्हाच्या […]










