सातारा

अर्भक मृत्यू प्रकरणात ‘सिव्हिल’च्या डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

अर्भक मृत्यू प्रकरणात जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉ. चांदसाहेब शिकलगार यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, जिल्हा शासकीय रुग्णालयात १६ मार्च २०२६ रोजी एका १६ वर्षांच्या मुलीला गर्भपात करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी गर्भपात प्रक्रियेदरम्यान जिवंत बाळाचा जन्म झाला. बाळावर आवश्यक ते उपचार करणे गरजेचे होते. सिव्हिल हॉस्पिटल सातारमधील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. चांदसाहेब शिकलगार (रा. सातारा) यांनी बाळास योग्य उपचार न पुरवले नाहीत. दरम्यान, अर्भक मृत्यू प्रकरण पुढे आल्यानंतर डॉ. चांदसाहेब शिकलगार यांना प्रशासनाने तातडीने निलंबित केले आहे. विजयपूर (कर्नाटक) येथील अल्पवयीन मुलगी गर्भवती होती. तिची प्रसूती जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात आली. मात्र, यादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. याप्रकरणी नातेवाइकांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये महिला व बालविकास विभागामार्फत याचिका दाखल करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *