नाशिक

“लग्नानंतर रात्री कशात व्यस्त असतेस?” चौथ्या पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब

कॉर्पोरेट विश्वाला हादरवून सोडणाऱ्या नाशिकच्याटाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लैंगिक छळवणूक आणि धर्मांतरण प्रकरणात पोलिसांनी पाचवा संशयित आरोपी रझा मेमन याला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणातील चौथ्या पीडित महिलेने समोर येऊन आपला जबाब नोंदवला असून, त्यातून कंपनीतील वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांच्या विकृत मानसिकतेचा पर्दाफाश झाला आहे. “हा विषय आपल्या दोघांमध्येच गुपित ठेव,” असे म्हणत रझा मेमनने या पीडितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचे समोर आले आहे.

पीडितेने दिलेल्या जबाबानुसार, मे २०२३ मध्ये ट्रेनिंग सुरू असताना ती रूममध्ये एकटी होती. तेव्हा रझाने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्याने तिला काही ‘कोडी’ घातली आणि त्याचे उत्तर मेसेजवर देण्यास सांगितले. “मी तुला अशी कोडी घालत राहीन, तू मला टीम्सवर उत्तर देत जा, पण हे आपल्या दोघांमध्येच सीक्रेट ठेव,” अशी अट त्याने घातली. पीडिता नवीन असल्याने दबावाखाली तिने ही गोष्ट कोणाला सांगितली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *