विज्ञान-तंत्रज्ञान

एअरटेल ग्राहकांना महागाईचा शॉक! ८४ दिवसांचा प्लॅन महागला

देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या किमतीत गुपचूप वाढ केली आहे. कंपनीने आपल्या सर्वात लोकप्रिय अशा ८४ दिवसांच्या प्लॅनची किंमत वाढवली असून, काही स्वस्त प्लॅन्स बंद करून ग्राहकांसमोर महागड्या रिचार्जचाच पर्याय ठेवला आहे. यामुळे सर्वसामान्य मोबाईल युजर्सचे बजेट कोलमडणार आहे.

एअरटेलचा जो प्लॅन आधी ८५९ रुपयांना मिळत होता, त्यासाठी आता ग्राहकांना ८९९ रुपये मोजावे लागणार आहेत. म्हणजेच थेट ४० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. किंमत वाढली असली तरी ग्राहकांना मिळणाऱ्या फायद्यांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. या प्लॅनमध्ये आजही दररोज १.५ GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि १०० SMS मिळतात. याचबरोबर कंपनीने ७९९ रुपयांचा आपला स्वस्त प्लॅन पोर्टफोलिओमधून हटवला आहे. यामुळे कमी किमतीत जास्त वैधता शोधणाऱ्या ग्राहकांची अडचण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *