ताज्या बातम्या नाशिक

शिवसेना सोशल मीडियाच्या उत्तर महाराष्ट्र विभागातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर….. दिनेश साधवानी लोकसभा प्रमुख पदी….

शिवसेना सोशल मीडियाच्या उत्तर महाराष्ट्र विभागातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर…..
दिनेश साधवानी लोकसभा प्रमुख पदी….

नाशिक शिवसेना सोशल मीडिया विभागाच्या उत्तर महाराष्ट्र विभागातील नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार तसेच खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.


लोकसभा प्रमुख दिनेश प्रिया बलराम साधवाणी, जिल्हा प्रमुख जॉर्ज निर्मला प्रसाद वर्षला, महानगर प्रमुख तनिष अर्चना प्रदीप शिंदे,उपजिल्हा प्रमुख हरीओम हेमकुंद सदाशिव लासनगांवकर, उपमहानगर प्रमुख सिद्धार्थ कुसुम संजय गुंजाळ, सोशल मीडिया समन्वयक
तेजस ज्योती संदीप सोमवंशी अशा प्रकारे नाशिक शहरात या नियुक्त्या शिवसेना सोशल मीडिया राज्य प्रमुख राहुल एन. कनाल, सोशल मीडिया उपराज्य प्रमुख प्रतीक संघ्या सुनील शर्मा आणि सोशल मीडिया उत्तर महाराष्ट्र प्रमुख मयूर मच्छिंद्र मगर यांच्या स्वाक्षरीने जाहीर करण्यात आल्या आहेत.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *