संपादकीय

कमी पावसाचा अंदाज

कृष्णानंद होसाळीकर
ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ

हवामानशास्त्राच्या भाषेत, सरासरीच्या ९० ते ९५ टक्के दरम्यान पडणारा पाऊस “बिलो नॉर्मल” म्हणून ओळखला जातो. देशाची दीर्घकालीन सरासरी पर्जन्यमान सुमारे ८७ सेंमी आहे, आणि यंदा त्याच्या सुमारे ९२ टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ९६ ते १०४ टक्के पाऊस “नॉर्मल” मानला जातो, तर ९० टक्क्यांखालील पाऊस “डेफिशियंट” म्हणून गणला जातो.पावसाच्या वितरणाचा विचार केला तर देशातील अनेक भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ईशान्य भारत, उत्तर-पश्चिम भारत आणि दक्षिणेतील काही भागांमध्ये मात्र सरासरी किंवा त्यापेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या संदर्भात पाहता, बहुतांश भागात कमी पावसाचा अंदाज आहे; मात्र पूर्व विदर्भासारख्या काही भागांत सरासरीपेक्षा किंचित जास्त पावसाची शक्यता आहे.

या स्थितीमागे “एल निनो” हा महत्त्वाचा घटक आहे. विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील तापमान वाढल्याने निर्माण होणारी ही स्थिती मान्सूनवर परिणाम करते. यंदा मान्सूनच्या उत्तरार्धात हिंदी महासागरातील आयओडी सकारात्मक होण्याची शक्यता असून, त्यामुळे पावसात काही प्रमाणात सुधारणा होऊ शकते. ही दिलासादायक बाब आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *