संपादकीय

सिलिंडरसाठी दुकानांसमोर मोठमोठ्या रांगा

अॅड. कांतीलाल तातेड,
अर्थशास्त्राचे अभ्यासक
पश्चिम आशियातील इराण, अमेरिका व इस्रायल यांच्यामधील युद्धामुळे भारताची तेलवाहू जहाजे अडकून पडल्याने देशातील ‘एलपीजी’चा पुरवठा विस्कळीत झालेला आहे. त्यामुळे देशात ‘एलपीजी’ सिलिंडर उपलब्धेची परिस्थिती चिंताजनक असून, सर्वसामान्य ग्राहकांनी ‘एलपीजी’ सिलिंडरचा वापर जपून करावा, तसेच पर्यायी इंधन म्हणून ‘पीएनजी’ जोडणी, इंडक्शन आणि इलेक्ट्रिक शेगड्यांचा विचार करावा, असे आवाहन केंद्र सरकारने नुकतेच केले आहे.

सरकारने हॉटेलसह व्यावसायिक ग्राहकांच्या सिलिंडरच्या पुरवठ्यामध्ये ५० टक्क्यांपर्यंत कपात केलेली आहे. सिलिंडरसाठी दुकानांसमोर मोठमोठ्या रांगा लागलेल्या आहेत. काही उपहारगृहे बंद पडलेली आहेत. हजारो कारखान्यांच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम झालेला आहे. सरकारने सिलिंडरचा काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासाठी १२ हजारांहून अधिक धाडी टाकलेल्या आहेत. त्यात १५ हजारांहून अधिक एलपीजी सिलिंडर्स जप्त केले आहेत. त्यामुळे पश्चिम आशियात युद्ध सुरू झाल्यानंतर केवळ एका आठवड्यातच एलपीजी सिलिंडरच्या बाबतीत देशात इतकी भीषण परिस्थिती निर्माण होणे धोरणात्मकदृष्ट्या योग्य आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *