दीप्ती देशमुख
उपमुख्य उपसंपादक
पश्चिम आशियातील युद्धसंघर्षात मृत्युमुखी पडलेल्या एका भारतीय खलाशाच्या पार्थिवाची ओळख पटविण्याचा प्रश्न अलीकडे उच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. दु:खाने खचलेल्या कुटुंबाला आपल्या मुलाला शेवटचा निरोप देता यावा, यासाठी न्यायालयाने त्याच्या अवशेषांची डीएनए चाचणी करण्याचे निर्देश दिले. सरकारने सुपूर्द केलेले अवशेष खरोखर त्याच व्यक्तीचे आहेत का, याची खात्री झाल्यानंतरच कुटुंब अंत्यसंस्कार करणार आहे. मात्र, येथे एक मूलभूत प्रश्न उभा राहतो-इतकी धडपड का आवश्यक आहे? याचे उत्तर केवळ कायद्यात नाही, तर मानवी भावनांमध्ये दडलेले आहे. मृत्यूनंतरही मानवी प्रतिष्ठा जपण्याची हमी भारतीय राज्यघटना देते. ही प्रक्रिया केवळ कायदेशीर औपचारिकता नसून, कुटुंबाला मिळणाऱ्या भावनिक ‘क्लोजर’चीही गरज पूर्ण करते. त्यात माणुसकीचा शेवटचा स्पर्श दडलेला असतो.
समुद्रावर नोकरी करणारा तरुण अनेक स्वप्ने उराशी बाळगून परदेशात जातो. घरच्यांसाठी तो अभिमानाचा विषय असतो. पण अचानक एक दिवस फोन येतो – तो परत येणार आहे, पण जिवंत नाही. या एका वाक्याने संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त होते. तरीही, अशा अवस्थेत कुटुंबाची सर्वात साधी आणि मानवी अपेक्षा असते – ‘आम्हाला त्याला शेवटचा निरोप द्यायचा आहे.’ परंतु जेव्हा पार्थिव अवशेष ओळखू न येण्यासारख्या अवस्थेत असतात किंवा परदेशात अडकून पडतात, तेव्हा हा प्रश्न केवळ भावनिक राहत नाही – तो ‘घटनात्मक हक्क, आंतरराष्ट्रीय कर्तव्य आणि प्रशासकीय जबाबदारी’ बनतो.

आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने ब्लु स्टार न्युज नाशिक आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.



