विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या ९ जागांसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक आहे. पण महायुतीने एक जादाचा उमेदवार दिला तर अटीतटीची लढत होऊ शकते. उद्धव ठाकरे २०२० मध्ये विधान परिषद सदस्य झाले. त्यांच्या आमदारकीचा कार्यकाळ १३ मे रोजी संपत असताना ते पुन्हा सभागृहात येतील का? याबाबत कमालीची उत्सुकता आहे. त्यांनी पुन्हा एकदा आमदारकी घ्यावी, असा त्यांच्या पक्षात आग्रह असल्याचे म्हटले जाते. विधिमंडळातील पक्षाची घडी नीट राहावी, यासाठी त्यांचे आमदार होणे गरजेचे आहे, असा मतप्रवाह पक्षात आहे. आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात, याबाबत उत्कंठा आहे. यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य केले आहे.
राज्यसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या उमेदवारीला महाविकास आघाडीने पाठिंबा दिला होता व ती निवडणूक बिनविरोध झाली होती. विधानसभेतील संख्याबळाचा विचार करता महाविकास आघाडीतील तीन पक्षांना मिळून एकच जागा विधान परिषदेत निवडून आणता येणार आहे. २०२० मध्ये या नऊ जागांसाठी निवडणूक झाली तेव्हा उद्धव ठाकरे हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते. त्यांना मुख्यमंत्री झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत आमदार होणे अनिवार्य होते. तेव्हाच नऊ जागांसाठीची निवडणूक बिनविरोध झाली. राज्यसभेला आम्ही शरद पवारांच्या पाठीशी राहिलो आता पवार गट आणि उद्धवसेना यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आणि दुसरीकडे ही जागा उद्धव ठाकरेंसाठीच सोडावी अशी भूमिका घेतली गेली तर मविआत पेच निर्माण होईल. याबाबत संजय राऊतांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली.

आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने ब्लु स्टार न्युज नाशिक आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.



