पालघर

पालघरची विजेची चिंता मिटली

बाभळेश्वर-कुडूस ४०० केव्ही हा वीजवाहिनी प्रकल्प गुरुवारी पूर्ण झाला असून, ही वीजवाहिनी सुरू करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे वीजपुरवठा सक्षम, स्थिर होणार असून, या वाहिनीवरून सुमारे ३ हजार मेगावॅटपर्यंत अतिरिक्त वीजवहन क्षमता उपलब्ध होणार आहे. त्याचा मुंबई, ठाणे, पालघर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांना फायदा होणार असून या वाहिनीमुळे महामुंबईत आता ब्लॅक आऊट होणार नाही, असे महापारेषणकडून सांगण्यात आले.

महापारेषणकडून बाभळेश्वर-कुडूस या वीजवाहिनी प्रकल्पासाठी १५०० कोटी रुपये खर्च झाले असून हा पंधरा वर्षांत हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. २०१० मध्ये मंजूर झालेल्या प्रकल्पाची अंमलबजावणी कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेडमार्फत करण्यात आली. सुरुवातीला २०१३ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. पण नवी वीजवाहिनी पुणे जिल्ह्यातील जागतिक दर्जाच्या रेडिओ दुर्बिणीच्या परिसरातून प्रकल्प मार्ग जात असल्याने विशेष परवानग्या घ्याव्या लागल्या, असे पारेषणकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *