नाशिक-मुंबई महामार्गावर कळवा येथील खारेगाव टोलनाक्याजवळ शनिवारी सकाळी एका भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार पती आणि पाठीमागे बसलेल्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला. कल्पेश रेवाळे (३०) आणि मीनाक्षी रेवाळे (३१, रा. भांडुप) अशी मृत पावलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. याप्रकरणी कळवा पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कल्पेश आणि मीनाक्षी हे दोघे आपल्या दुचाकीवरून नाशिककडून मुंबईच्या दिशेने जात होते. खारेगाव टोलनाक्याजवळ आले असताना, नाशिककडूनच येणाऱ्या एका भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. धडक इतकी जोरात होती की, दोघेही रस्त्यावर फेकले गेले आणि ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रकचालक शिवकुमार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने ब्लु स्टार न्युज नाशिक आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.
