शहरातील पेट्रोल पंप होणार कोरडे….
टँकर चालकांनी संप पुकारल्याने पेट्रोल पंप होणार कोरडे. पाणेवडी प्रकल्प येथे टँकर चालक आले नसल्याने शहरात होणारा पेट्रोल डिझेलचा पुरवठा खंडित होणार आहे. मनमाड येथे असलेल्या भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल, हिंदुस्तान पेट्रोलियम चा पुरवठा करणाऱ्या टँकर चालकांनी अचानक रिपोर्ट न केल्याने वाहन धारकांची तारांबळ होणार आहे.
काही दिवसांपूर्वी केंद्राच्या नवीन कायद्याविरोधात ट्रक चालकांनी संप पुकारल्याने पेट्रोलपंपावर नागरिकांनी गर्दी केली होती. १२ जानेवारी रोजी नाशिक शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा असून त्या अगोदर टँकर चालकांच्या संपामुळे नागरिकांना त्रास होणार असून स्टॉक असे पर्यंत पेट्रोल डिझेल मिळणार असल्याचे पंप चालकांनी सांगितले.