नाशिक पुणे महामार्गवर एस टी बसला आग…. चालकाच्या प्रसंगावधानमुळे अनर्थ टळला…
नाशिक शहरात वाहनांना आग लागण्याचे प्रकार सुरूच असून आज नाशिक-पुणे महामार्गावर उपनगर नाका येथे सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास सिन्नर बस डेपोच्या बस क्रमांक एम.एच.14/बी टी 4117 या बसला अचानक आग लागली. बसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आग लागल्याची माहिती आहे. इंजिनमधून धूर येत असल्याचे एस टी चालक बी एस बर्कुळे आणि वाहक डी टी आव्हाड यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ बस बाजूला घेतली. उपनगर सिग्नल येथे बसच्या बॅटरीच्या वरील वायरिंग हिला आग लागली असल्याचे लक्षात आली. बसचे चालक व वाहक तसेच शहर वाहतूक शाखा युनिट चार चे पीटर मोबाईल वरील चालक विजय गवते हे पेट्रोलिंग करत असताना घटना कळल्यावर तिथे पोहोचले आणि बसमधील सतरा प्रवासी यांना लागलीच खाली उतरवून घेतले. उपनगर सिग्नल येथून तेव्हाच मनपाचे कर्मचारी पंकज जगडे हे पाण्याचा टँकर घेऊन जात होते गवते यांनी त्वरित येणारी वाहतूक थांबविली. टँकर चालकाला परिस्थिती सांगून टँकर बाजूला घेऊन चालक बुरकुळे आणि गवते यांनी जीवाची पर्वा न करता बसमध्ये मध्ये पाण्याचा फवारा मारून आग विझविली आणि मोठा अनर्थ झाला नाही. बस मधील डिझेल टँकर हे पूर्णपणे भरलेले होते तिथं पर्यंत आग पोहोचली असती तर मोठा अनर्थ झाला असता पण प्रसंगावधानाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. चालकाच्या आणि वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याने दाखविलेल्या प्रसंगावधानाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. घटना स्थळी वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक कदम, सहायक पोलिस निरीक्षक धनराज पाटील, सुमित इतोकर, बर्वे, शेलार आदींनी वाहतूक सुरळीत केली.