मुंबई हायकोर्टाने धीरज मगर शोभा मगर यांचा जामीन नामंजूर
शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे यांचा वाद शोभा मगर यांच्याबरोबर झाला होता महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवरून अहवाल चिघळला होता वाद शिवी गाळीत रूपांतर झाला आणि हा वाद थेट मुंबई नाका पोलीस स्टेशन मध्ये गेला. शोभा मगर व त्यांचा मुलगा धीरज मगर याने लक्ष्मी ताठे यांना जातीवाचक शिवीगाळ केली याचा व्हिडिओ पोलीस प्रशासनाच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद आहे. या सगळ्या वादानंतर लक्ष्मी ताठे यांनी मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. सदरील गुन्हा ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार पोलिसांनी दाखल करून घेतला मात्र आरोपींना अटक करण्यात आले नाही संशयित आरोपी शोभा मगर व त्यांचा मुलगा धीरज मगर याने नाशिक येथील न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला असता नाशिक मधून जामीन नामंजूर करण्यात आला शोभा मगर व धीरज मगर यांनी थेट मुंबई येथे धाव घेऊन हायकोर्टात जामीन अर्ज दाखल केला मात्र हा जामीन अर्ज आज मुंबई हायकोर्टाने नामंजूर केला आहे पोलिसांना तातडीने संशय त्यांना अटक करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहे.